AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ

Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला… रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ

| Updated on: Jul 30, 2026 | 11:37 AM
Share

दिल्लीतील जंतर-मंतर येथे 30 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी (CJP) करत होती. विविध विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलनादरम्यान काही घोषणांवरून आणि वापरलेल्या भाषेवरून वाद निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेवबाबा यांनी आंदोलन आणि त्यातील काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देश रस्त्यावर चालणार नाही, तो संसदेतच चालणार. शिक्षण मंत्री कोण असेल आणि कोण नाही हे रस्त्यावर ठरणार नाही. देशाचे पंतप्रधान आणि देशाची संसद ते ठरवेल.”

पुढे त्यांनी, “संविधानाने दलित, शोषित, वंचितांना जे अधिकार दिलेत तेच अधिकार ब्राह्मणांनाही दिले आहेत. त्यामुळे ब्राह्मणवाद म्हणून शिव्या देणं चुकीचं आहे,” असे म्हटले.

तसेच रामदेवबाबा म्हणाले, “गेल्या काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर जेन झीने एकत्र येत भारताला फक्त बदनाम केलं. शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती नाही. विरोध करायचा असेल तरी तो विवेकपूर्ण असला पाहिजे.” त्यांच्या या वक्तव्यावर आता संबंधित पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 30, 2026 11:37 AM

Follow Us