देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे भाजपचे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी आणि डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्र या विषयात पदविका मिळविली. फडणवीस यांनी नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’चा मान मिळविणारे ते पहिलेच नेते आहेत. 1999 ते आतापर्यंत सलग पाचवेळा फडणवीस आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सध्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री (Deputy CM of Maharashtra) आणि गृहमंत्री (Home Minister of Maharashtra) म्हणून कार्यरत आहेत.
Read MoreCM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
Sanjay Raut : आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याबाबत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Aug 29, 2026
- 12:01 am
कुंभमेळा विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, CM फडणवीस विरोधकांवर बरसले, म्हणाले…
CM Fadnavis : नाशिकमध्ये कुंभमेळा विकास कामांना वेग आला आहे. अशातच विरोधक या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Aug 28, 2026
- 7:26 pm
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे… भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात आले, अशी टोलेबाजी छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी सुचवले की, मुख्यमंत्र्यांनी दर महिन्याला नाशकात यावे, जेणेकरून सर्व रस्ते कायमस्वरूपी चांगले राहतील. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 28, 2026
- 5:47 pm
Devendra Fadnavis : शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी होऊ शकतो, पण..मुख्यमंत्र्यांनी कुठली टेक्नोलॉजी वापरण्याचा दिला सल्ला?
Devendra Fadnavis : "जी राज्य उत्पादकतेत खूप पुढे होती, ती उत्पादकतेच्या अंतिम सीमेवर पोहोचली आहेत. मोठ्या प्रमाणात रासायनिक खत वापरामुळे ती क्षमता कमी झाली आहे" असं मुख्यमंत्री म्हणाले.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 28, 2026
- 3:30 pm
Raksha Bandhan: दरवर्षी रक्षाबंधनाला राज ठाकरेंना राखी बांधणारी दुसरी मानलेली बहिण कोण? त्यांचं नाव काय?
आज देशभरात सर्वत्र रक्षाबंधानाचा सोहळा साजरा केला जात आहे. आता या नेतेमंडळींनी आपल्या घरी हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. ज्याचे फोटो आता समोर आले आहे.
- Saloni Patil
- Updated on: Aug 28, 2026
- 1:19 pm
आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून… नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्यावर तो गंभीर आरोप, म्हणाले राहुल गांधी…
Navnath Ban Criticized Congress: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांजरी येथील आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी हे आंदोलन पेटवण्याचा आरोप त्यांनी केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 28, 2026
- 11:51 am
Nepal Flood: तिबेटमध्ये अडकले महाराष्ट्रातील 37 भाविक; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी मदत
महाराष्ट्रातील 37 भाविक सागा इथं अडकले होते. त्यामुळे त्यांना सुरक्षितपणे काठमांडूपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. काठमांडूमधून 29 ऑगस्टला विमान असल्याने वेळेत पोहोचणं अत्यावश्यक होतं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 28, 2026
- 10:56 am
अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात
संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले की, अमित शाहांनी मराठी भाषा शिकवण्याची मोहीम अक्षरशः केराच्या टोपलीत टाकली. दिल्लीच्या दबावाखाली शिंदे गट काम करत असून, शाहांनी घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही, यावरून त्यांचा पक्ष अमित शाहच चालवतात हे उघड झाले आहे. ही मराठी माणसाची शोकांतिका आहे, असे राऊत म्हणाले.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 28, 2026
- 10:34 am
आज जीआर हाती नाही दिला तर… मांजरीत 600 आदिवासी विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम, काय दिला इशारा?
Collective Hunger Strike: विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 16 दिवसांपासून त्यांचे पुण्यातील मांजरी येथे उपोषण सुरू आहे. आज या विद्यार्थ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. काय आहे त्यांचा इशारा?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 28, 2026
- 9:20 am
प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला, मराठी भाषेसंदर्भातील फडणवीसांच्या निर्णयावरून महायुतीत धुसफूस? घडलं काय?
Devendra Fadnavis -Eknath Shinde Marathi : अमराठी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली. पण या निर्णयावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 28, 2026
- 8:29 am
Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. त्यापूर्वी त्यांनी सरकारला त्रुटी दूर करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. जरांगेंशी बोलणी सुरू असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 28, 2026
- 8:03 am
Maharashtra News LIVE : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. अमराठी रिक्षाचालकांना मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 28, 2026
- 7:46 pm