Devendra Fadnavis | विस्तारित समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली या मार्गांच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी संबंधित यंत्रणांना कामे ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही कारणामुळे प्रकल्प रखडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर–गोंदिया तसेच भंडारा–गडचिरोली या मार्गांच्या कामांना गती देण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी संबंधित यंत्रणांना कामे ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही कारणामुळे प्रकल्प रखडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. या विस्तारित मार्गांमुळे विदर्भातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होणार आहे.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या, भूसंपादन, वनविभाग आणि पर्यावरणाशी संबंधित मंजुरी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. समृद्धी महामार्गाचा हा विस्तारित भाग राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याने, प्रशासनाने जबाबदारीने आणि वेगाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध

