Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; निवडणुक काळात मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळातील घडामोडींवर भाष्य करत मोठा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान राज्यातील काही मोठे नेते आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा मुंडे यांनी केला. मुंडे म्हणाले की, अशा प्रतिकूल परिस्थितीतही परळीकरांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि विजयी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळातील घडामोडींवर भाष्य करत मोठा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान राज्यातील काही मोठे नेते आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा मुंडे यांनी केला. मुंडे म्हणाले की, अशा प्रतिकूल परिस्थितीतही परळीकरांनी त्यांना भक्कम पाठिंबा दिला आणि विजयी केले. “मला बदनाम करण्यासाठी जे काही करता येईल ते काही मोठे नेते करत होते. त्यामुळे एका टप्प्यावर मला वाटू लागलं की, आपल्यात नक्कीच काहीतरी विशेष आहे, अन्यथा इतके लोक आपल्याविरोधात का उभे राहतील,” असे ते म्हणाले. तसेच, “हा माणूस आपल्याला पुरून उरेल, या भीतीनेच विरोधकांनी प्रयत्न केले,” असा टोला लगावत मुंडे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, या आरोपांवरून पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 19, 2026 06:45 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

