AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?

Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?

| Updated on: Sep 27, 2026 | 6:17 PM
Share

गणेश विसर्जनानंतर गोरेगाव येथील सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांचा गूढ मृत्यू झाला आहे. आर्यन आणि प्रभाकर अशी मृतांची नावे आहेत. पहाटेच्या सुमारास मित्रांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले आणि तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपास करत आहेत.

मुंबईतील गोरेगाव राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनानंतर पहाटेच्या सुमारास आर्यन आणि प्रभाकर नावाच्या या दोन मित्रांना शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळले. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनानंतर थकलेले असल्याने जेवण करून रात्री उशिरा ते शौचालयात गेले होते.

रात्री २.४० ते ३.०० च्या दरम्यान मित्रांनी त्यांना शोधले असता, एक दरवाजा आतून बंद आणि दुसरा अर्धवट उघडा दिसला. आतमध्ये ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून, दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन गणेशोत्सवासाठी सफाळ्याहून आला होता, तर प्रभाकर कामाशेट्टी येथे राहत होता. घटनेमागे नेमके काय कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. काही मित्रांनी आतून दुर्गंधी आल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे ऍसिड किंवा अन्य काही घातक वायूचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

Published on: Sep 27, 2026 06:17 PM

Follow Us