AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Gas Cylinder | युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा, पॅनिक बुकिंग टाळण्याचे केंद्राचे आवाहन

LPG Gas Cylinder | युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा, पॅनिक बुकिंग टाळण्याचे केंद्राचे आवाहन

| Updated on: Mar 19, 2026 | 7:53 PM
Share

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात LPG गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना पॅनिक बुकिंग करू नये, असे आवाहन केले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्च रोजी देशभरात तब्बल 56 लाख LPG बुकिंग नोंदवण्यात आले.

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशात LPG गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना पॅनिक बुकिंग करू नये, असे आवाहन केले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्च रोजी देशभरात तब्बल 56 लाख LPG बुकिंग नोंदवण्यात आले. पॅनिक बुकिंगमुळेच काही ठिकाणी रांगा वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारत सुमारे 90 टक्के LPG आणि 47 टक्के LNG कतारमधून आयात करतो, त्यामुळे मध्यपूर्वेतील घडामोडींचा थेट परिणाम देशावर होतो. दरम्यान, भारताची सुमारे 22 जहाजे होर्मूझ सामुद्रधुनीत अडकली असून, याबाबत इराणशी संवाद सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा मात्र सध्या सुरळीत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Published on: Mar 19, 2026 07:53 PM
Follow Us