Ashok Kharat | भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा; फार्महाऊसवर पिस्तूल…
भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या मालमत्तेची झाडाझरती सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या काही वर्षांत खरात यांनी सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर तपासाला वेग आला आहे.
भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या मालमत्तेची झाडाझरती सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या काही वर्षांत खरात यांनी सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर तपासाला वेग आला आहे. नाशिक पोलिसांनी मिरगाव येथील त्यांच्या फार्महाऊसवर रात्री उशिरा छापा टाकून तपासणी केली. या कारवाईदरम्यान फार्महाऊसमधून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तसेच काही वापरलेले आणि काही न वापरलेले काडतुसेही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. खरात यांच्या मालमत्तेचा आणि जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा सखोल तपास करण्यात येत आहे.
Published on: Mar 19, 2026 05:46 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

