AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 14 लाख 24 हजार 520 मतदार आहेत. यात 7 लाख 45 हजार 392 पुरुष मतदार असून 6 लाख 78 हजार 576 महिला मतदार आहेत. सुमारे 1583 मतदान केंद्र असून यंदा प्रथमच 9 वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. महापालिकेत एकूण 31 प्रभाग आहेत. यातून 122 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. 

कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

कल्याण डोंबिवली महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 31 प्रभाग आहेत.

2) कल्याण डोंबिवली महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- कल्याण डोंबिवली महापालिकेवर एकूण 122 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 14 लाख 24 हजार 520 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 45 हजार 392 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 78 हजार 576 इतकी आहे. 
 

KDMC:केडीएमसीत भाजप-सेनेत धुसफूस, या पदासाठी मोठी रस्सीखेच

KDMC BJP-Shivsena: कल्याण डोंबिवली महापालिकेत आता स्थायी समिती सदस्य, सभापती आणि सभागृह नेते पदावरून मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. १६ फेब्रुवारीला केडीएमसीची महासभा होत आहे. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि सेनेत या पदांसाठी मोठी फिल्डिंग लागली आहे. काय आहे अपडेट?

केडीएमसीच्या महापौरपदी हर्षाली थविल, तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर

कल्याण डोंबिवली महापालिकेला अखेर महापौर मिळाला असून, शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये डिंपल मेहता महापौरपदी विराजमान झाल्या. मात्र, डिंपल मेहता यांच्या निवडीवरून मराठी एकीकरण समितीने तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही अमराठी महापौर झाल्याने समिती आक्रमक झाली आहे.

KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर, राजकीय हालचाली वाढल्या; नेमकं काय

कल्याण-डोंबिवली महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाल्याने हर्षाली थविल यांचे नाव चर्चेत आले आहे. ३ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत.

ठाकरे गटापुढे सर्वात मोठं संकट, 4 नगरसेवक गायब होताच थेट पोलीस...

कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे चार नगरसेवक गायब झाल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाने या नगरसेवकांचे पोस्टर लावल्याने आता या नगरसेवकांचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाले आहेत.

शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा

ज्यांच्याविरोधात प्रचारात रान उठवलं त्यांनाच पाठिंबा दिल्याबद्दल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या यावर अखेर राज ठाकरेंनी ट्विट द्वारे भूमिका मांडली.

ठाण्यात दलित, KDMC मध्ये आदिवासी महापौर होणार; तर उल्हासनगरमध्ये काय?

Thane, KDMC, Ulhasnagar: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदाकडे लागलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचं महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर झालं, ते जाणून घ्या..

कल्याण-डोंबिवलीत ऑपरेशन लोटसला शिंदे स्टाईल उत्तर, मनसेला मिळणार

कल्याण-डोंबिवलीत ५० जागा जिंकूनही भाजपची कोंडी झाली असून, शिंदे गटाने ५३ नगरसेवक आणि मनसेच्या पाठिंब्याच्या जोरावर महापौरपदावर दावा ठोकला आहे. ठाकरे गटातील नगरसेवकांच्या संभाव्य बंडखोरीमुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

ठाकरे बंधू अनेक वर्षांनंतर राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानंतर त्यांच्या एकीत पहिला तडा गेल्याचं चित्र दिसत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप करणाऱ्या मनसेने निकालानंतर शहराच्या विकासाचं कारण पुढे करत भूमिका बदलली आहे.

Sanjay Raut: एकवेळ भाजपसोबत निर्णय घेऊ, पण शिंदे...

Sanjay Raut: कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी मनसेने शिंदेसेनेसोबत घरोबा केल्याने एकच काहूर उठलं आहे. विरोधात लढल्यानंतर शिंदेसेनेसोबत जाण्यावरून राजकारण तापलेलं आहे. तर हा स्थानिक पातळीवरील निर्णय असून त्याविषयी तिथल्या पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर आता राऊतांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा