AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट

वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट

| Updated on: Nov 22, 2026 | 4:34 PM
Share

वाशिम जिल्ह्यात दुष्काळामुळे गोशाळांना चारा आणि पाणीटंचाईचा गंभीर सामना करावा लागत आहे. सुमारे ३००० ते ४००० जनावरांसाठी चारा मिळवणे कठीण झाले असून, सोयाबीन आणि तुरीच्या चाऱ्याची मोठी कमतरता आहे. यामुळे गोशाळांवर आर्थिक बोजा वाढत असून, आगामी महिन्यांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

वाशिम जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे यंदा तीव्र दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाचा मोठा फटका शेतीसोबतच गोशाळा आणि गोरक्षण संस्थांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण २३ गोशाळा आणि गोरक्षण संस्था असून, त्यांमध्ये सुमारे ३००० ते ४००० जनावरे आहेत. या जनावरांना सध्या चारा आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याच्या चाऱ्याचे उत्पादन घटले आहे. पूर्वी ५०% तूर आणि हरभऱ्याचा चारा उपलब्ध व्हायचा, तो यंदा १% ही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे केवळ सोयाबीनच्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे, पण त्याचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.

गोशाळांना बाजारातून चारा खरेदी करावा लागल्यास मोठा आर्थिक भार सहन करावा लागेल. सध्या नोव्हेंबर महिन्यापासूनच चाऱ्याची ही गंभीर समस्या निर्माण झाली असून, पुढील आठ महिने कसे काढायचे, हा मोठा प्रश्न गोशाळांच्या संचालकांसमोर आहे. पाण्याच्या समस्येनेही गंभीर स्वरूप धारण केले आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन गोशाळांना मदतीसाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी गोशाळांकडून करण्यात येत आहे.

Published on: Nov 22, 2026 04:34 PM

Follow Us