विधानसभा निवडणूक 2024 - मतदारसंघाची यादी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. राज्यात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदार याद्याही अद्ययावत केल्या आहेत. मतदारांना आपलं नाव मतदार यादीत चेक करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार आहेत. त्याशिवाय 1 लाख 16 हजार 355 सर्व्हिस वोटर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. राज्यात पहिल्यांदाच 20.93 लाख नवीन मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे.