Ajit Pawar : मोठी बातमी… पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक? अनौपचारिक गप्पांमध्ये अजित दादांनी काय म्हटलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. येत्या आठवड्यात दहा माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पुढच्या आठवड्यात पुणे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली आहे. अधिवेशनानंतर महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, जोरदार तयारी करत आहेत. भाजपपाठोपाठ शिंदेची शिवसेनाही पुण्यामध्ये सक्रिय झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादीविना लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
तर दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेसाठी आपल्याकडे १६५ उमेदवार तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांचे राजकारण पुणेकरांच्या हिताचे असेल आणि तरुणाईवर भर दिला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपने जंबो प्लॅन तयार केला आहे. मुख्यमंत्री सोमवारी तीन हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ही कामे मार्गी लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. स्थायी समितीकडून जवळपास ३९० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, विकासकामांचा धडाका सुरू आहे.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत

