AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal On LPG Crisis | नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट आकडेवारी सांगितली!

Chhagan Bhujbal On LPG Crisis | नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट आकडेवारी सांगितली!

| Updated on: Mar 14, 2026 | 6:19 PM
Share

राज्यात गॅस सिलेंडर टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना स्पष्ट संदेश दिला आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत काही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात गॅस सिलेंडर टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना स्पष्ट संदेश दिला आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत काही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. भुजबळ म्हणाले की, राज्यात घरगुती एलपीजीची दररोज सुमारे 9 हजार मेट्रिक टन मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन उत्पादन वाढवून ते 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. तसेच मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. गॅस पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि इतर अत्यावश्यक सेवांना गॅसचा पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही अडचणींसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअ‍ॅप सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Published on: Mar 14, 2026 06:19 PM
Follow Us