AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान

पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते… मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान

| Updated on: Nov 03, 2026 | 1:15 PM
Share

पुणे मेट्रो प्रकल्प हा आधुनिक विकासाचा नवा अध्याय लिहित आहे. अजित पवारांचे या प्रकल्पात मोठे योगदान आहे. राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण २०१७ अंतर्गत पीपीपी मोडवर राबवलेला हा देशातील पहिला प्रकल्प आहे. यात १००% महिला ट्रेन चालक असून, ५०% इतर कर्मचारी महिला आहेत, ज्यामुळे पुणेकरांचे जीवन सुपरफास्ट होत आहे.

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदीजींचे पुणे मेट्रो प्रकल्प मिशन मोडवर अत्यंत कौशल्याने पूर्ण केल्याबद्दल मनापासून आभार मानण्यात आले. पीएमआरडीए आणि मेट्रोच्या चमूचे, विशेषतः श्रवण हरडीकर आणि अभिजीत चौधरी यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सहकार्याने हे प्रकल्प पुढे सरकले आहेत, असेही नमूद करण्यात आले. पुण्याच्या ऐतिहासिक भूमीवर आज आधुनिक विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. राजमाता जिजाऊ मासाहेबांनी बाल शिवबांच्या हाती सोन्याचा नांगर देऊन पुण्याच्या पुनर्निर्माणाचा आणि वैभवाचा शुभारंभ केला होता, त्याच परंपरेचा हा आधुनिक आविष्कार आहे. यावेळेस अजित पवारांचे विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून, त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पुण्याच्या बाबतीत ते नेहमीच अतिशय संवेदनशील होते. कुठलीही वास्तू लोकार्पण करायची असेल, तेव्हा ते तिची बारकाईने पाहणी करायचे. कुठे वायर राहिली आहे का, कुठे रंग कमी झाला आहे का, कुठे त्रुटी राहिल्या आहेत का, अशा प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी या प्रकल्पांना चालना देण्याचे आणि अनेक बैठका घेण्याचे काम केले.

Published on: Nov 03, 2026 01:15 PM

Follow Us