AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi | काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi | काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

| Updated on: Mar 14, 2026 | 4:21 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. देशात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. देशात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही. अशा कठीण काळात काँग्रेसने जबाबदार राजकीय पक्ष म्हणून भूमिका बजावण्याची अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसकडून देशात पॅनिक निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, काँग्रेस सोशल मीडियावर खोट्या माहितीचा प्रसार करत असल्याचाही आरोप पंतप्रधानांनी केला. काँग्रेसने जणू खोटे रील्स तयार करण्याची इंडस्ट्रीच उघडली आहे, असा टोला त्यांनी लगावला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकार परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Published on: Mar 14, 2026 04:21 PM
Follow Us