NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे कारभार करत असल्याची तक्रार या नेत्यांनी शहांकडे केली आहे. यामुळे पक्षामध्ये नाराजी असून, अनेक महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये वरिष्ठ नेत्यांना विचारात घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन पक्षातील अंतर्गत घडामोडींबाबत तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नेत्यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांना डावलून संपूर्ण पक्षाचा कारभार सुरू असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, युवती अध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय युवक प्रदेशाध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या पदांच्या निवडीच्या प्रक्रियेत पार्थ पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना डावलले होते. यामुळे पक्षात तीव्र नाराजी आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही निर्णय प्रक्रियेतून सातत्याने बाजूला ठेवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमधील पराभवानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आत्मचिंतन आणि बैठकीची गरज असल्याचे ट्वीट केले होते, त्यातून ही नाराजी त्यावेळीही दिसून आली होती.
Published on: Nov 02, 2026 06:36 PM
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....

