सुनेत्रा पवार
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा मान सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार आहे. सुनेत्रा पवार या दिवंगत अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादीची कमान त्यांच्या हाती येणार आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी त्यांना आपला नेता मानलं आहे. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.
Sunetra Pawar : मोठी बातमी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार, निवड एकमताने झाली का?
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव कोणी मांडला? कोणी अनुमोदन दिलं? ही सर्व प्रक्रिया कशी पार पडली? ही निवड एकमताने झाली का? जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Jan 31, 2026
- 2:27 pm
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या घडामोडीत रोहित पवार यांचं ट्विट; काय केलं भाष्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून तात्काळ निवड अपेक्षित आहे. या घडामोडींवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत अजितदादांच्या 'स्वर्गीय' उल्लेखावर आणि सध्याच्या राजकीय उत्साहावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. यामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे.
- manasi mande
- Updated on: Jan 31, 2026
- 2:23 pm
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बनणार उपमुख्यमंत्री, पण ‘हे’ महत्वाचं खातं फडणवीसांकडेच; शपथविधी पूर्वी राजकीय घडामोडींना वेग
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. खातेवाटप, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
- manasi mande
- Updated on: Jan 31, 2026
- 2:03 pm
Sunil Tatkare | गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर ‘ते’ पत्र देणार; तटकरेंची माहिती
2 वाजता राष्ट्रवादी पक्षाची विधिमंडळात बैठक होईल. जनतेची भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार याचं उपमुख्यमंत्री पदासाठी निवड होणं अपेक्षित आहे. ते झाल्यावर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे अधिकृत पत्र आहे, ते देण्यासाठी या बैठकीत मुख्यमंत्र्याची भेट घेऊ आणि नंतर मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 31, 2026
- 1:55 pm
Anjali Damania: दादा गेल्यानंतर शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित? अंजली दमानिया यांचा तो मोठा बॉम्ब
Anjali Damania Big Statements: बुधवारी अजितदादांना भीषण विमान अपघातानं हिरावून घेतलं. त्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीत मोठी राजकीय खलबतं सुरू झाली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आला. त्यानंतर लागलीच आज शपथविधी होणार असल्याचे समोर आले. यापार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी बॉम्बगोळा टाकला आहे.
- Reporter Girish Gaikwad
- Updated on: Jan 31, 2026
- 1:44 pm
Sunil Tatkare NCP : 12 तारखेच्या विलिनीकरणाचा शरद पवारांचा दावा खोडून काढताना सुनील तटकरेंनी काय उत्तर दिलं?
Sunil Tatkare NCP : सकाळपासून 17 जानेवारीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्या व्हिडिओत विलीनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते करत होते. त्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलं आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jan 31, 2026
- 1:32 pm
Chhagan Bhujbal | त्या प्रश्नावर भुजबळांचे कानावर हात, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना पक्षातील सध्याच्या घडामोडींबाबत आपले मत व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही यावर भुजबळ यांनी थेट भाष्य केलं नाही. मला याबाबत काही माहिती नाही, असं म्हणत त्यांनी हा विषय टोलवला. विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही, असं भुजबळांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 31, 2026
- 1:27 pm
Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार, बैठकांचं सत्र, पार्थ पवारांच्या गळ्यात खासदारकीची माळ?
Sunetra Pawar Resign MP Post: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. मोठी खलबतं सुरू आहे. बारामतीसह मुंबईत अनेक घडामोडी घडत आहेत. पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. पवार या राज्यसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा देणार आहेत.
- Reporter Akshay Mankani
- Updated on: Jan 31, 2026
- 12:58 pm
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण लटकणार ? छगन भुजबळ यांचं एक वाक्य अन् तर्कवितर्कांना जोरदार उधाण
छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजितदादांच्या गटाने विलिनीकरणासाठी १० बैठका घेतल्या होत्या, तरी भुजबळांच्या 'काही ऐकले नाही' या भूमिकेने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची प्राथमिकता आणि विलिनीकरणाची अनिश्चितता यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत आहेत.
- manasi mande
- Updated on: Jan 31, 2026
- 12:55 pm
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार… शरद पवारांना कल्पनाच नाही…., बारामतीत शुक्रवारी रात्री काय घडलं?
Ajit Pawar plane crash: राज्याचे उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपतदाची जबाबदारी पत्नी सुनेत्रा पवार हाती घेतील... अशी माहिती समोर येत आहे. पण याची कोणतीच कल्पना शरद पवार यांना नाही... तर बारामतीत शुक्रवारी रात्री असं काय घडलं?
- shweta Walanj
- Updated on: Jan 31, 2026
- 12:47 pm
Sunetra Pawar : अजून अजितदादांचं दहावं झालेलं नसताना इतकी घाई कशाला? अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं उत्तर
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वेगवान हालचाली सुरु आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाची कमान त्यांच्याहाती देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे खूप घाई करतायत अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर दिलं आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Jan 31, 2026
- 12:45 pm
Devgiri Bungalow | देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
राष्ट्रवादीची धुरा एका नव्या हातात म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याची प्रक्रिया आज होतेय. कारण अजित पवार यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. मात्र दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची विधिमंडळात बैठक होणार आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 31, 2026
- 12:40 pm