AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नसून घातपात, निष्पक्ष चौकशी न झाल्यास मंत्रालयात आत्मदहन, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने मोठी खळबळ

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्याची चौकशी सुरू आहे. तर आमदार रोहित पवार हे सातत्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील काही पदाधिकऱ्यांनी आता योग्यरित्या चौकशी व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.

Ajit Pawar: अजितदादांचा अपघात नसून घातपात, निष्पक्ष चौकशी न झाल्यास मंत्रालयात आत्मदहन, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने मोठी खळबळ
अजित पवार विमान अपघातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 9:29 AM
Share

श्रीराम क्षीरसागर/ प्रतिनिधी: दिवंगत अजित पवार यांचा बारामती विमानतळावर विमान अपघातात(Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला. या मृत्यूनंतर तो घातपात असल्याचा सशंय अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यात आमदार रोहित पवार यांनी तर या मुद्दावरून रान पेटवलं आहे. चार पत्रकार परिषदेत त्यांनी सादरीकरण करत वैमानिकाच्या माध्यमातून अपघात घडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी VSR कंपनी आणि मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ते देशातील बड्या नेत्यांनाही भेटले.एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि सीआयडी यांच्या तपासावर ही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते आणि पदाधिकारी सुद्धा या विमान अपघाताने अस्वस्थ आहेत. ज्याप्रकारे तपास सुरू आहे. तपासाची गती यावर त्यांनी तोंडसुख घेतले आहे. निष्पक्ष आणि योग्य तपासासाठी आता पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यासोबतच आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे अमरण उपोषण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे आमरण उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे पदाधिकारी मोहन मुंडे यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या मागणीसाठी ते धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून उपोषण करत आहेत. मोहन मुंडे यांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यांनी तपासाववर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तर मंत्रालयामध्ये आत्मदहन करणार

मोहन मुंडे यांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघाताच्या पूर्वी अजित पवार विमानतळावर पोहोचल्याचे CCTV फुटेज सार्वजनिक करावे. या प्रकरणी दोषींवर एफआयआर दाखल करावा. अपघाताची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी अशा मागण्या उपोषणकर्ते मोहन मुंडे यांनी केल्या आहेत. दरम्यान, या मागण्या मान्य न झाल्यास 1 मे रोजी मुंबई येथे मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा मोहन मुंडे यांनी दिला आहे.

कार्यकर्त्यांत मोठी धुसफूस?

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याप्रकरणी सातत्याने प्रश्न विचारत आहेत. त्यांनी याप्रकरणी चार पत्रकार परिषद घेत तपास आणि यंत्रणांवरील दबाव यावर गंभीर आरोप केले आहेत. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही आमदारही याप्रकरणी तपासावर नाखूष असल्याचे समोर आले आहेत. याप्रकरणी काही नेत्यांचे मौन अनेकांना खटकत आहेत. तर दादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेने नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. तर आत्मदहनाचाही इशारा दिला आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?