5 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबादचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. यापूर्वी या भागावर निजामांचे राज्य होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तसेच हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आल्यानंतर लातूर जिल्ह्याचा भाग तत्कालीन बॉम्बे प्रांताचा हिस्सा बनला. नंतर 1960 मध्ये बॉम्बे प्रांत एक जिल्हा झाले. पुढे 1982 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या भागावर सातवाहन, शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्लीचा सुलतान, दक्षिण भारतातील बहामनी शासक, आदील शाही आणि मुघल यांनी शासन केले. जिल्ह्यातील मुख्य नदी मांजरा आहे. तेरना, तावरजा, घर्नी या उपनद्या आहेत. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7157 चौरस किमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील गावांची संख्या 948 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 77.26 % आहे. हा जिल्हा हवाई मार्गे मुंबईशी जोडण्यात आलेला आहे. येथील मुख्य पिकं तृणधान्ये, तेलबिया, डाळी, द्राक्षे आदी आहेत. लातूर जिल्ह्यात पर्यटनस्थळांसोबतच अनेक धार्मिक स्थळे आहेत. जगदंबामाता मंदिर गंजगोलाई, सूरत शावली दर्गा, सिद्धेश्र्वर आणि रत्नेश्वर मंदिर, श्री केशव बालाजी मंदिर, बुद्ध गार्ड्न (मंदिर), श्री विराट हनुमान मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. तर, हत्ती बेट, वृंदावन पार्क, खरोसा लेणी, औसाचा किल्ला आणि उदगीरचा किल्ला ही पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत. 1993 मध्ये या जिल्ह्यात किल्लारी येथे अतिशय भीषण असा भूकंप आला होता. या भूकंपात जवळपास तीस हजार लोक मृत्युमुखी पडले होते. मात्र, त्यातूनही हा जिल्हा पुन्हा नव्याने उभा राहिला आहे. या जिल्ह्यात 10 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्याला पाच उपविभाग आणि 10 तालुक्यांमध्ये विभागण्यात आलंय. लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, देवणी, निलंगा, रेणापूर, शिरूर, शिरूर अनंतपाळ आदी दहा तालुके या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात लातूर ग्रामीण, उदगीर, लातूर शहर, निलंगा, अहमदपूर आणि औसा या सहा विधानसभेच्या जागा आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे याच जिल्ह्यातील आहेत.
लातूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
स्व. विलासराव देशमुखम यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले होते. तर दिवस उजाडल्यापासून लातुरातील नागरिकांची पावले ही बाभळगावच्या ...
राज्यात 1 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. उत्पादनात वाढ झाल्याने बाजारपेठेतील दर कमी होणार हे निश्चित असतानाच आता हमी भाव ...
कृषी विभागाचे नियोजन आणि उन्हाळी हंगामात सोयाबीनचा वाढलेला पेरा यामुळे यंदा सोयाबीन बियाणांचा तर तुटवडा भासणार नाही. असे असतानाही महाबीजने यंदा दरात वाढ केली आहे. ...
रविवारी भर दुपारी लग्न सोहळा पार पडल्यानंतर वऱ्हाडी मंडळीच्या जेवणावळी उठल्या. त्या दरम्यान उन्हाचा पाराही चढलेलाच होता. लग्नासाठी केदारपूर काटेजवळगा, जवळगा ,अंबुलगा बु ,सिंदखेड यासह ...
लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये निलंगा आणि औसा तालुक्यातच पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र, देवणी ,शिरूर-अनंतपाळ ,रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. ...
पोलीस भरतीसाठी हे दोघेही युवक गेल्या काही दिवसांपासून व्यायाम करत होते, त्यासाठी ते दोघेही दगडवाडीच्या जवळ व्यायामासाठी येत होते. मात्र त्यांच्यावर आज काळाने घाला घातला. ...
गढूळ आणि पिवळसर पाण्याचे नेमके कारण काय आहे हे शोधून काढण्यासाठी पाईपलाईद्वारे जो पाणीपुरवठा होता तो बंद करण्यात आला होता. शिवाय मांजरा धरणावरील वरचे गेटही ...