हर्षित राणा याला आयसीसीने सुनावणी शिक्षा, कारण काय?

4 डिसेंबर  2025

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र हर्षितने काय चुकीचं केलं?

हर्षित राणा याला रांचीतील पहिल्या वनडे मॅचमध्ये केलेल्या चुकीमुळे शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हर्षितवर आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हर्षित पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हीस याच्यासोबत भिडला होता.

हर्षितला डेवाल्डसोबत हुज्जत घालणं महागात पडलं. हर्षितची ही कृती आयसीसीच्या हिशोबाने कायद्याचं उल्लंघन करणारी आहे.

हर्षित टीम इंडियासाठी पहिल्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

हर्षितने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 ओव्हर बॉलिंग केली होती.

हर्षितने या 10 ओव्हरमध्ये 65 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या होत्या.