महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक 2025
राज्यात 246 नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा करताच आजपासूनच या नगरपरिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 25 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भागात नगर परिषदेची स्थापना केली जाते. नगर परिषदांचे अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग नगर परिषदा असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नगर परिषदेसाठी प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. नगर परिषेदेतील सदस्याला नगरसेवक म्हणतात. नगरसेवेकातून एकाची नगराध्यक्ष आणि एकाची उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली जाते. नगरपरिषदेचा कालावधी 5 वर्षाचा असतो म्हणजेच दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात. नगराध्यक्षाचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
मोठी बातमी! पंजात ‘कमळाचं’ फुल; काँग्रेस नगरसेवकांचं भाजपला मत, उपनगराध्यक्ष दिला निवडून
Congress BJP Alliance: युती, आघाडी होतील. पण काँग्रेससोबत कधीच जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण या नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपने चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या नव्या युतीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
- Reporter Sanjay Sarode
- Updated on: Jan 18, 2026
- 2:09 pm
CM Fadnavis : फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही खपवून…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकोट आणि अंबरनाथमधील काँग्रेस-एमआयएमसोबतच्या स्थानिक आघाड्यांवर संताप व्यक्त केला आहे. अशा आघाड्या भाजपसोबत चालणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले, तसेच कारवाईचे संकेत दिले. काँग्रेसला नेहमीच तीव्र विरोध राहिल्याचे सांगत शिंदे साहेबांचा उठाव याच वृत्तींविरोधात होता असेही त्यांनी नमूद केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Jan 7, 2026
- 2:32 pm
BJP-MIM : सत्तेसाठी भाजप-MIM युती; नवीन अकोट पॅटर्न, राजकारणात मोठी खळबळ
BJP-MI Alliance: Party With Difference असलेल्या भाजपने राज्यात नवीन अकोट पॅटर्न आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. एरव्ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचा शंखनाद करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी विचारधाराच गुंडाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओवेसी यांच्या एमआयएमसोबत हातमिळवणीने एकच खळबळ उडालेली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 7, 2026
- 12:33 pm
Phulmbari:जादूटोण्यामुळे पराभव झाला हो! फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराच्या अजब दाव्याने एकच खळबळ, थेट पोलिसात धाव…
Chhatrapati Sambhajinagar: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा धुराळा खाली बसला आहे. पण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. तर काही उमेदवारांनी जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा दावा केला आहे. असाच दावा फुलंब्रीतील शिवसेना उमेदवाराने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 2, 2026
- 10:41 am
चिंतन पटेल यांनी मंत्रोच्चारात स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार
धुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले शिरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे विजयी उमेदवार चिंतन पटेल यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी 11 ब्राह्मणांच्या उपस्थितीत वैदिक मंत्र उच्चारात चिंतन पटेल यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 24, 2025
- 7:22 pm
पुणे : आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला फक्त एकच मत
पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळाल्याने त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 23, 2025
- 11:13 pm
राजकारणात भूकंप, अजित पवार-शरद पवार एकत्र येणार; घोषणेची तारीखही ठरली!
अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षात लवकरच युती होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत खुद्द अजित पवार हेच घोषणा करण्याची शक्यता आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 23, 2025
- 3:18 pm
महाराष्ट्रभर झंझावात… पण सांगलीच्या तासगावमध्ये भाजपच्या अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त, कसं घडलं? मोठी खळबळ
सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अंतर्गत गटबाजी, संदीप गिड्डे पाटलांना डावलणे आणि तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या हस्तक्षेपाला या पराभवाचे कारण मानले जात आहे. भाजप पदाधिकारी स्वप्नील पाटलांच्या राजीनाम्याची किंवा हकालपट्टीची मागणी करत आहेत.
- Reporter Shankar Devkule
- Updated on: Dec 23, 2025
- 1:16 pm
Rane Brothers Feud : राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला, 16 जानेवारीनंतर कोकणात मोठा बॉम्ब फुटणार? नितेश राणे यांचा संकेत
कोकणातील नगरपरिषद निवडणुकीनंतर राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष वाढला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत, 16 जानेवारीनंतर (महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर) कोकणात मोठा राजकीय स्फोट होईल, असे संकेत दिले आहेत. निलेश राणेंवर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप करत, बोलवता धनी कोण, हे उघड करण्याचे आश्वासन दिले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 23, 2025
- 11:57 am
BJP Maharashtra : भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय; फडणवीसांची घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भाजपचे १२९ नगराध्यक्ष आणि ३,३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा मिळाल्या. भाजपने महाविकास आघाडीचा सफाया केल्याचा फडणवीस यांचा दावा आहे, तसेच आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 23, 2025
- 11:45 am
Jayant Patil: सगळ्यांना हाणलं नाही तर…सांगलीतील बॅनरची राज्यभर चर्चा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला?
Jayant Patil Sangli: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने अनेकांना अनपेक्षित धक्का दिला आहे. निवडणुकीत रणधुमाळीत जिव्हारी लागणारी टोलेबाजी करण्यात आली. तर निकालानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. असाच कलगीतुरा आता सांगलीत रंगला आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या बॅनरची राज्यभर चर्चा सुरू आहे.
- Reporter Shankar Devkule
- Updated on: Dec 23, 2025
- 10:11 am
Nagar Parishad Election Result: मंचर नगरपंचायतीत उमेदवाराला चक्क एकच मत, आता आम आदमी पक्षाने घेतला हा मोठा निर्णय
Manchar Nagar Panchayat Election Result: पुणे जिल्ह्यातील आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंचरमध्ये नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चांगलीच गाजली. आता या निवडणुकीत सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी आता आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
- Reporter Sunil Thigale
- Updated on: Dec 23, 2025
- 8:45 am