AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP-MIM : सत्तेसाठी भाजप-MIM युती; नवीन अकोट पॅटर्न, राजकारणात मोठी खळबळ

BJP-MI Alliance: Party With Difference असलेल्या भाजपने राज्यात नवीन अकोट पॅटर्न आणल्याने एकच खळबळ उडाली आहे. एरव्ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचा शंखनाद करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी विचारधाराच गुंडाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओवेसी यांच्या एमआयएमसोबत हा‍तमिळवणीने एकच खळबळ उडालेली आहे.

BJP-MIM : सत्तेसाठी भाजप-MIM युती; नवीन अकोट पॅटर्न, राजकारणात मोठी खळबळ
भाजप-एमआयएम युतीImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 07, 2026 | 12:33 PM
Share

Akot-Ambernath Alliance Stir in State: अकोला जिल्हा तसा प्रयोगशील मानल्या जातो. बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन आघाडीचा प्रयोग इथेच यशस्वी करून दाखवला. त्यामुळे अकोल्याला राजकीय, सामाजिक प्रयोग नवीन नाहीत. पण आताच्या अकोट पॅटर्नने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला. कारण पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती आणि विचारधाराच गुंडाळून ठेवल्याचे समोर आले आहे. अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इतकेच नाही तर अंबरनाथमध्ये सुद्धा काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे मोठे धाडस स्थानिक भाजप नेतृत्वाने दाखवले आहे. कटोगे तो बटोगेचा नारा आणि आता थेट एमआयएमशी हातमिळवणी यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली आहे.

अकोट पॅटर्नची राज्यभर चर्चा

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अकोटमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला मोठी खेळी खेळावी लागली. विचारधारेशी फारकत घ्यावी लागली. अकोट विकास मंचाचा हा प्रयोग राज्यात गाजला. कारण या मंचात भाजप 11 जागांनिशी आघाडीवर आहे. तर एमआयएम 5 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या मंचात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे नगरसेवक आहेत. अकोटमध्ये एकूण 33 सदस्य आहेत. त्यात अकोट विकास मंचाचे 25 सदस्य आणि नगराध्यक्ष पदाच्या माया धुळे मिळून 26 जण झाले आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य हे विरोधी गोटात असतील.

अंबरनाथमध्ये शिंदे गोटाला खो, काँग्रेसच्या हातात कमळ

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही असाच अनोखा प्रयोग झाला आहे. येथे मित्रपक्ष शिंदे गटाला खो देत भाजपने काँग्रेसच्या हातात कमळ दिले आहे. या नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे. या नवीन सत्ता समीकरणावर शिंदे सेना नाराज झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधूनही नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे. पण भाजपने दोन्ही ठिकाणी दाखवलेल्या धाडसाची राज्यभर चर्चा रंगली आहे.

भाजप नेते उत्तर देतील

याप्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी खास उत्तर दिले आहे. अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीविषयी त्यांना विचारले असता हा भाजपचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. याप्रश्नावर भाजपचे नेते उत्तर देतील असे त्यांनी सांगितले. तर  अंबरनाथमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात उठाव केला होता. काँग्रेसला आमचा विरोध होता आणि राहील, असे ते म्हणाले. राज्यात आणि केंद्रात महायुती आहे, त्यामुळे आम्ही अशी आघाडी केली नाही असा टोलाही शिंदेंनी लगावला.

मुख्यमंत्री अकोट आणि अंबरनाथ पॅटर्नवर नाराज

दरम्यान अकोट आणि अंबरनाथ पॅटर्नवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि कांग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कोटमध्ये भाजप आणि एमआयएम तसेच अंबरनाथमध्ये भाजप आणि कांग्रेस अशी युती झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आता याप्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले
सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले.
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा.
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा.
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान.
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका.
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे.
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.