AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराळे मास्तर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, video viral

दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांच्या गैरहजेरीवरून कराळे मास्तरांनी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना जाब विचारल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर आता जंतरमंतरवर कराळे पोहचले आहेत.

कराळे मास्तर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, video viral
Nitesh Karale 'Master' at Jantar Mantar
| Updated on: Jul 22, 2026 | 8:01 AM
Share

दिल्लीत सीजेपी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या पोलीस आणि केंद्र सरकार विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या आंदोलक विद्यार्थ्यांना मदतीचे हातही पुढे येत आहे.वर्ध्यातील नितेश कराळे मास्तर देखील सध्या चर्चेत आले आहेत. नितेश कराळे मास्त नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. सीजेपी आंदोलनात काँग्रेससह विरोधी पक्षाने सहभाग का घेतला नाही यावरुन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना बोल लगावल्याचा कराळे मास्तरांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आता दिल्लीच्या जंतरमंतर कराळे मास्तर डोक्यावरुन बिस्कीट – पाणी घेऊन दाखल झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे.

आपल्या विशिष्ट लकबीने ठीकाय..म्हणत संवाद साधत एमपीएस्सीसह स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे वर्धा येथील कराळे मास्तर नेहमीच चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते असलेल्या कराळे मास्तरांनी गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट मिळवण्याचा खूप प्रयत्न केला होता. मातोश्रीवर देखील कराळे मास्तर दाखल झाले होते. मात्र, त्यांना तेथे प्रवेश न मिळाल्याने ते नाराज देखील झाले होते.

आता कराळे मास्तरांनी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना तुम्ही दिल्लीच्या आंदोलनात सामील का झाला नाही यावरुन छेडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातच आता नितेश कराळे मास्तर दिल्लीच्या जंतर-मंतर येथे दाखल झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कराळे मास्तर आपल्या डोक्यावर बिस्कीट आणि पाण्याची बाटली घेऊन आंदोलकांना वाटप करताना या व्हिडीओत दिसत आहेत.

कराळे मास्तर कोण आहेत ?

नितेश कराळे (कराळे मास्तर) हे वर्धा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते,वक्ते आणि ‘फिनिक्स अकॅडमी’चे संचालक आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेसने आंदोलन केले का नाही असा सवाल करत नेते माणिकराव ठाकरे यांना कडाडून जाब विचारला होता.

येथे पाहा व्हिडीओ –

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी