AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

विजेता दहिया यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत ते बर्गर खात असल्याचा दावा केला जातोय. एकीकडे सीजेपीच्या आंदोलनात तरुण लाठ्या खात होते. तर दुसरीकडे विजेता दहिया या हे बर्गर खाताना दिसले, असा आक्षेप नोंदवण्यात आला.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
vijeta dahiya and cjpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 10:11 PM
Share

CJP Removes Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात सध्या दिल्लीमध्ये मोठो आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. अनेक सिने अभिनेते-अभिनेत्रींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सीजेपीच्या या आंदोलनाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विरोधी बाकावरील नेत्यांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधा यांचा राजीनामा मागितला जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता सीजेपीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीजेपीच्या या अचानक निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जातेय.

सीजेपीने नेमका काय निर्णय घेतला?

कॉकरोच जनता पार्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीजेपीने विजेता दहिया यांना आपल्या प्रवक्तेपदावरून हटवले आहे. एकीकडे सीजेपीचे दिल्लीत आंदोलन सुरू असताना दुसरीकडे विजेता दहिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विजेता दहिया हे बर्गर घाताना दिसत आहेत. सोबतच ते या व्हिडीओत काही आक्षेप नोंदवत आहेत. याच व्हिडीओमुळे सीजेपीने ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

सीजेपीने निर्णय घेताना काय कारण दिले?

कॉकरोच जनता पार्टीने हा निर्णय घेताना आम्ही विजेता दहिया यांच्या असंवेदनशील कृत्याची निंदा करतो, असेही म्हटले आहे. अशा प्रकारची वागणूक ही स्वीकारार्ह नाही. दहिया यांनी केलेली कृती ही आमच्या विचारांशी सुसंगत नाही, असं सीजेपीने म्हटलं आहे.

वाद का झाला?

विजेता दहिया यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत ते बर्गर खात असल्याचा दावा केला जातोय. एकीकडे सीजेपीच्या आंदोलनात तरुण लाठ्या खात होते. तर दुसरीकडे विजेता दहिया या हे बर्गर खाताना दिसले, असा आक्षेप नोंदवण्यात आला. दहिया हे मी कोणालाही उत्तरदायी नाही, असं मत या व्हिडीओत मांडत आहेत. तसेच माझं बर्गर खाणं आज एवढा चर्चेचा मुद्दा का होत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आता दहिया यांना सीजेपीने प्रवक्तेपदावरून हटवलं आहे. यावर दहिया यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...