AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Delhi Protest : शरद पवार अभिजित दीपकेंना भेटले, म्हणाले काय मदत पाहिजे? जंतर मंतरवर काय घडलं?

पवार यांनी दीपके यांची भेट घेतली. त्यानंतर दीपके यांनी सध्या आंदोलनाची काय स्थिती आहे, याची माहिती पवार यांना दिली. सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना एका प्रकारे नजरकैदेत ठेवलं आहे. आमच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत, असं दीपके यांनी सांगितले.

CJP Delhi Protest : शरद पवार अभिजित दीपकेंना भेटले, म्हणाले काय मदत पाहिजे? जंतर मंतरवर काय घडलं?
sharad pawar and abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 4:15 PM
Share

Sharad Pawar Meets Abhijeet Dipke : सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर सुरूच आहे. दरम्यान, या आंदोलनात आता विरोधी पक्षदेखील सहभागी होत आहेत. एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे अभिजित दीपके यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे खासदार सरद पवार हे दीपके यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अभिजित दीपके आणि पवार यांच्यात संवाद झाला आहे.

नेमका काय संवाद झाला?

पवार यांनी दीपके यांची भेट घेतली. त्यानंतर दीपके यांनी सध्या आंदोलनाची काय स्थिती आहे, याची माहिती पवार यांना दिली. सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना एका प्रकारे नजरकैदेत ठेवलं आहे. आमच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीमाना झाला पाहिजे. आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपये द्यावे. सर्व आंदोलकांवरील देशातील एफआयआर मागे घ्या. तसेच वांगचुक यांना सोडा, अशा आमच्या मागण्या असल्याची माहिती दीपके यांनी पवार यांना दिली.

आणखी किती दिवस आंदोलन करणार

तसेच यावेळी पवार यांनी तुम्हाला काय मदत हवी आहे, अशी विचारणा केली. त्यावर सर आम्हाला मदतीची गरज नाही. जे काही लागेल ते मी अनिशला सांगतो, असे सांगितले. त्यानंतर पवार यांनी आंदोलन आणखी किती दिवस करणार, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना आम्ही 31 दिवसांपासून इथेच आहोत. एक महिना झाला. काल जे झालं त्यामुळे सरकारचा राग आला आहे. आम्ही काय मागत होतो. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो, असं दीपके म्हणाले.

विद्यार्थ्यांबाबत शरद पवार अत्यंत चिंतीत होते

तसेच यावेळी महाराष्ट्रातील विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहेत. शरद पवार असो की उद्धव ठाकरे सर्व सोबत आहेत. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांबाबत विचारलं. सुप्रिया सुळेंनी फोन केला होता. इथे बॅरिकेड्स आहेत. त्यामुळे पवार साहेबांना आम्ही आत घेऊन जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांबाबत शरद पवार अत्यंत चिंतीत होते. सर्वच लोक येतील. अनेक लोक येऊन गेले, असेही दीपके यांनी माध्यमांना सांगितले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...