AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

मोदींच्या घरासमोर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ठिय्या मांडला

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!
rahul gandhi and cjp protest Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 3:55 PM
Share

Delhi CJP Proest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलात  देशभराती तरुण सामील झाले आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा सीजेपी तसेच इतर आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा विरोधक संसदेत उपस्थित करताना दिसत आहेत. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असतानाच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच विरोधी पक्षातील बडे नेते जंतर-मंतरवर जाणार आहेत. हे सर्व महत्त्वाचे नेते सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह इतरही आंदोलकांची भेट घेणार आहेत.

दिल्लीमध्ये काय घडतंय?

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विरोधी बाकावरील काँग्रेस तसेच इतर पक्षाच्या नेत्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलकांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर नेते हे जंतर-मंतरच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी सत्ताधारी मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांकडून धरपकड सूर

एकीकडे हे बडे नेते आक्रमक झाल्याचे दिसताच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. मोदी यांच्या निवासस्थानावर ठिय्या मांडलेला असतानाच काही नेत्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या भूमिकेवरही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांची गुंडागर्दी सुरू आहे, असा आरोप या आंदोलक नेत्यांकडून केला जातोय. दुसरीकडे खासदार शरद पवार हे जंतर-मंतरवर पोहोचले असून त्यांनी अभिजित दीपके यांची भेट घेतली आहे. त्यांनी दीपके यांना काय मदत हवी आहे, अशी विचारणा केली आहे. अभिजित दीपके आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ संवाद झाला असून दीपके यांनी पोलिसांनी किती अन्याय केला, याबाबतची माहिती पवार यांना सांगितली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ