अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जनंतर देशातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देशवासियांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही प्रत्येक भारतीय कुटुंबावर झाल्यासारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक राष्ट्रभक्तानाे दिल्लीत दाखल व्हा असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. कोणतेही उत्तर न देता आणि कोणतीही जबाबदारी न स्वीकारता या प्रकरणातून बाहेर पडता येणार नाही, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचाही त्यांनी दावा केला.
प्रियंका गांधी यांनीही आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 21, 2026 06:27 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...