AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखिलेश यादव देखील पोलिसांच्या ताब्यात होते. अखेर तीन तासानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली आहे.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
सोनिया गांधी पोलीस स्टेशनमध्ये Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 21, 2026 | 10:19 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान प्रियंका गांधी यांना ज्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्या पोलीस ठाण्यात सोनिया गांधी देखील पोहोचल्या . प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्यानंतर सोनिया गांधी देखील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या . शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तब्बल तीन तास आंदोलन केलं.  त्यानंतर आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांना देखील ताब्यात घेतलं होतं.  राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे  काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीमधील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, परंतु त्याची सुटका होत नसल्याने सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या . सोबत वकील देखील होते. मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली, जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर तब्बल तीन तासांनंतर आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोल सुरू असतानाच  मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांना आपल्या पाच मागण्या सांगितल्या होत्या,  धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी अशा विविध मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यानंतर काही वेळातच आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...