AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : पाहिजे तर गोळी घाला, पण.. अंडरवर्ल्डची धमकी मिळूनही झुकला नाही शाहरुख खान

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची काळी सावली होती. अनेक स्टार्सना माफियांचे धमकीचे फोन यायचे. शाहरुख खानलाही अशीच धमकी मिळाली होतीस पण त्याने त्यांच्यासमोर गुडघे टेकण्यास नकार दिला होता.

Shah Rukh Khan : पाहिजे तर गोळी घाला, पण.. अंडरवर्ल्डची धमकी मिळूनही झुकला नाही शाहरुख खान
Actor Shah Rukh Khan
| Updated on: Sep 05, 2026 | 9:25 PM
Share

1980 आणि 90 च्या काळात अंडरवर्ल्डकडून बॉलिवूडमध्ये खूपच दखल दिली जात होती. अंडरवर्ल्डमधील अनेल कोलं बॉलिवूडच्या फिल्म्सवर पैसे लावायचे. अनेक मोठ-मोठ्या स्टार्सना अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळायच्या. अशाच स्टार्सपैकी एक होता बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan ). इतरांप्रमाणेच त्यालाही धमकी मिळाली होती. मात्र अशी धमकी मिळाल्यावरही शाहरूख बिलकूल घाबरला नाही त्याने अंडरवर्ल्डसमोर झुकण्यास, त्यांच्यासमोर गुडघे टेकण्यास नकार दिला. पाहिजे तर मला गोळी मारा, असं उलट त्याने सुनावलं होतं.

शाहरुखलाही मिळाली धमकी

‘हुसैन जैदी फाइल्स’ पॉडकास्टदरम्यान दिग्दर्शक संजय गुप्ताने या गोष्टीचा खुलासा केला. शाहरुख हा बॉलिवूडमधील असा एकमेव माणूस होता,  जो अंडरवर्ल्डला घाबरला नाही, ना त्याच्यावर धमक्यांचा परिणाम झाला.  ‘काहीही झालं तरी मी तुमचा चित्रपट करणार नाही’, असंच त्याने माफियांना सुनावलं होतं, असं गुप्ता यांनी सांगितलं.

बिलकूल घाबरला नाही किंग खान

संजय गुप्ता यांनी सांगितलं की, जेव्हा शाहरुखला धमकी मिळाली तेव्हा तो म्हणाला होता मी कधीच तुमचा पिक्चर किंवा शो करणार नाही… मी पठाण आहे. पाहिजे तर मला गोळी घाला. मी तुम्हाला घाबरत नाही, तुमच्यासोबत कधीच काम करणार नाही ना कोमताही शो करेन. खरंतर त्याने त्या लोकांचा आदर मिळवला. कमीत कमी अशी एक तरी व्यक्ती आहे जो धमक्यांना घाबरत नाही, असं त्यांना वाटलं असेल, असं गुप्ता म्हणाले. मात्र या घटनेनंतर सतत तीन वर्ष शाहरुखसोबत पोलिसाची कडेकोट सुरक्षा होती.

डुप्लीकेटच्या वेळेस होता जीवाला धोका

फिल्म क्रिटीक अनुपमा चोप्रा यांनीही किंग ऑफ बॉलीवुड: शाहरुख खान या त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. शाहरुख खान जेव्हा मेहश भट्ट यांच्या डुप्लीकेट सिनेमात काम करत होता, तेव्हा पोलिसांनी महेश भट्ट यांना इशारा दिला होता की शाहरुखच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर त्यांच्यासाठी पर्सनल बॉडीगार्डची नेमणूक करण्यात आली होती.

अबू सलेमचा जेव्हा फोन आला…

या पुस्तकात आणखीही एका घटनेचाही उल्लेख आहे, जेव्हा अबू सालेमने शाहरुखला कॉल केला होता. त्याच्या जवळच्या प्रोड्युसरसोबत काम करण्यास शाहरुखने नकार दिल्याने, त्या गँगस्टरने कथितरित्याशाहरुखला फोन करून शिव्या दिल्या होत्या. मात्र त्यावेळी शाहरुखने अतिशय सांभाळून संवाद साधला होता. मात्र चित्रपट करण्यासाठी सालेमने शाहरुखवर दबाव टाकला होता. तेव्हा त्याने त्यालाच ऐकवलं. कोणाला मारायचं हे मी तुला सांगत नाही ना, मग कोणता चित्रपट करायचा हे तू मला नको शिकवू, अशा शब्दांत त्याने सालेमला सुनावल्याचं सागितलं जातं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...