AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला फक्त चौकार-षटकार मारताना नाही, तर कसोटीतही वर्चस्व गाजवताना पाहायचंय! इंग्लंडच्या दिग्गजाची खास इच्छा

Alastair Cook Wants Vaibhav Sooryavanshi to Dominate Test Cricket: इंग्लंडचे दिग्गज खेळाडू अॅलिस्टर कूक यांनी युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. त्याच्यामध्ये अशी प्रतिभा आहे जी त्यांनी यापूर्वी कधीही पाहिली नाही, असे म्हटले आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला फक्त चौकार-षटकार मारताना नाही, तर कसोटीतही वर्चस्व गाजवताना पाहायचंय! इंग्लंडच्या दिग्गजाची खास इच्छा
Alastair Cook Makes a Big Statement on Vaibhav Suryavanshi
| Updated on: Nov 28, 2026 | 11:08 PM
Share

वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार अॅलिस्टर कुक यांना आता वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मोठे विक्रम मोडणाऱ्या या भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्येही आपली छाप सोडावी असे वाटते. कुक यांचा विश्वास आहे की, वैभवकडे अशी विलक्षण प्रतिभा आहे. जी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये एक विशेष शक्ती बनवू शकते. शिवाय कसोटी क्रिकेटला वैभवसारख्या निर्भीड आणि प्रेरणादायी खेळाडूंची गरज आहे.

अॅलिस्टर कुक यांनी वैभवची खूप प्रशंसा केली. ते म्हणाले की, प्रत्येक पिढीला एका प्रेरणादायी खेळाडूची गरज असते. ज्याच्याकडे मुले आदर्श म्हणून पाहू शकतील. जर वैभवने सर्व फॉरमॅटमध्ये हे यश मिळवले, तर ती कसोटी क्रिकेटसाठीही एक मोठी उपलब्धी ठरेल. त्याच्याकडे अशी प्रतिभा आहे जी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. मला आशा आहे की तो कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासही उत्सुक असेल. कसोटी क्रिकेटला अशा खेळाडूंची गरज आहे जे जोखीम पत्करण्यास तयार असतात. तो कदाचित यशस्वी होणार नाही, पण हरकत नाही.

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने पुढे सांगितले की, वैभव व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. हा तरुण फलंदाज रेड-बॉल क्रिकेटमध्येही अशीच कामगिरी करत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कुक यांच्या मते, क्रिकेटला अशा खेळाडूंची गरज आहे जे आपल्या खेळाने पुढच्या पिढीला प्रेरणा देऊ शकतील. वैभव सूर्यवंशीने इतक्या लहान वयात बॅटने केलेले पराक्रम आश्चर्यकारक आहेत. 2025 मध्ये, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला.

त्यानंतर आयपीएल 2026 मध्ये त्याच्या बॅटने धुमाकूळ घातला. वैभवने संपूर्ण हंगामात 776 धावा केल्या आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याच काळात त्याने विक्रमी 72 षटकारही ठोकले. नुकतेच दोहा येथे झालेल्या रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये वैभवने अशी धुमाकूळ घातली की संपूर्ण क्रिकेट जग थक्क झाले. युएईविरुद्ध इंडिया ‘अ’ संघाकडून खेळताना त्याने अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत 28 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.

वैभवने अवघ्या 28 चेंडूंमध्ये आपले शतक आणि 52 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण करून लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक आणि सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. वैभवची फलंदाजीची शैली आक्रमक आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकण्यावर त्याचा विश्वास आहे. मात्र कसोटी क्रिकेट फलंदाजासाठी एक वेगळीच परीक्षा असते. त्यासाठी पाच दिवसांचा संयम, तंत्र आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक असते.

अॅलेस्टर कूक यांचे शब्द महत्त्वपूर्ण आहेत, कारण ते स्वतः एक महान कसोटी फलंदाज होते. इंग्लंडसाठी 161 कसोटी सामन्यांमध्ये 12,472 धावा केलेल्या कूक यांना या प्रकारात यश मिळवणे किती कठीण आहे याची जाणीव आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा स्पष्ट आहे की, वैभवने केवळ व्हाईट-बॉल क्रिकेटपुरते मर्यादित न राहता, कसोटी क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवावे. आता विक्रम मोडणारा हा तरुण फलंदाज रेड-बॉल क्रिकेटमध्ये केव्हा आणि कसा आपली बॅट उगारतो, हे पाहणे बाकी आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!