AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा

सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर… प्रवासाचा खोळंबा

| Updated on: Nov 28, 2026 | 5:22 PM
Share

सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. विमानात एसी बंद पडल्याने प्रवाशांना दोनदा खाली उतरवण्यात आले. बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्यामुळे अखेर सर्व प्रवाशांना बसनं गोव्यातील मोपा विमानतळावर हलवण्यात आलं, ज्यामुळे प्रवासाला मोठा विलंब झाला.

सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या एका विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. या घटनेमुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानामध्ये एसी (Air Conditioner) बंद पडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तब्बल दोन वेळा विमानातून खाली उतरवण्यात आले.

विमान दुरुस्त होईल या आशेने प्रवासी ताटकळले होते, मात्र बिघाड वेळेत दुरुस्त होऊ शकला नाही. त्यामुळे, विमान कंपनीने तात्पुरता उपाय म्हणून सर्व प्रवाशांना बसनं गोव्यातील मोपा विमानतळावर हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, अनेकांच्या नियोजनावर याचा परिणाम झाला आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरील या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अनपेक्षित प्रवासाला आणि विलंबामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Published on: Nov 28, 2026 05:22 PM

Follow Us