AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैनिक प्रेमभावना नसलेले असतात? मग त्यांना मुले कशी होतात? ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाण्याच्या वादावर, सलमान खानचा सवाल ?

अभिनेता सलमान खान याचा ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट आधी गलवान नावानेच रिलीज होणार होता. गलवान खोऱ्याच चीनी सैनिकांशी बिहारी बटालियनच्या सैन्यांचा झालेल्या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे. याचे नाव आता बदलण्यात आले आहे. आणि हा चित्रपट येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सैनिक प्रेमभावना नसलेले असतात? मग त्यांना मुले कशी होतात? ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाण्याच्या वादावर,  सलमान खानचा सवाल ?
salman khan
| Updated on: Nov 29, 2026 | 12:06 AM
Share

अभिनेता सलमान खान याच्या आगामी चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्यातील शब्दांवरुन सध्या वाद सुरु आहे. ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी या वादावर आपले मत मांडले आहे. हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या दर्जाबद्दल बोलताना त्यांनी चित्रपट आणि त्यातील गाणी ही समाज मनाचा आरसा असतो. आजच्या पिढीचा शब्दसंग्रह हा त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा फारतर आजी – आजोबांच्या तुलनेत खूपच मर्यादित झालेला आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब या गीतामध्ये पडणारच अशा आशयाचे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले आहे. आजच्या पिढीचा शब्दसंग्रह मर्यादित असल्याने हे होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर सलमान खान याने सैनिकांचा चित्रपट म्हणजे गंभीरच असायला हवा का ? सैनिक बोअरींग असतात ? त्यांना प्रेमभावना नसते का? मग त्यांना मुले कशी होतात ? असा सवाल केला आहे.

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सलमान खानच्या आगामी युद्धपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्यावरून सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली आहे. हिंदी चित्रपटांमधील गाण्यांचा दर्जा घसरत असल्याच्या टीकेवर बोलताना त्यांनी म्हटले की, चित्रपटांमधील गाणी ही समाजाचे प्रतिबिंब असतात. आजच्या पिढीचा शब्दसंग्रह त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या तुलनेत मर्यादित झाला आहे.

गीतलेखन आणि समाजातील सांस्कृतिक बदल यांचा संबंध स्पष्ट करताना जावेद अख्तर यांनी सांगितले की, ‘चित्रपटसृष्टी आणि चित्रपटांमधील संगीत या काही वेगळ्या गोष्टी नाहीत. त्या समाजाचाच एक भाग आहेत. आजची जनरेशन झी असो किंवा मोठ्या वयाचे लोक असोत त्यांचा शब्दभांडार त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या तुलनेत तितकेसे समृद्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, ‘लोकांचा शब्दसंग्रह आता मर्यादित झालेला आहे. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती स्वतःमध्येच एक सुंदर कला आहे. तुम्ही भाषेचा वापर कसा करता, यावर तिचे सौंदर्य आणि सभ्यता अवलंबून असते. मात्र, आज आपल्या भाषांकडे किती लक्ष दिले जाते? आज किती लोक साहित्य आणि कविता वाचतात? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

नफा महत्त्वाचा झालाय ! कला आणि साहित्याच्या तुलनेत नफ्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे सांगत जावेद अख्तर पुढे म्हणाले की, ‘भविष्यात परिस्थिती बदलेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. “आज समाज पूर्णपणे व्यवहारी झाला आहे. नफ्याची व्याख्या आता एवढीच उरली आहे की, यामुळे बँकेत पैसे जमा होतात का ? पैसे काढता येतात का? जर तसे होत नसेल, तर त्याचा उपयोग काय? असा सवाल जावेद अख्तर यांनी केला आहे.

संगीत, कला आणि साहित्य यांच्यातील रस आता मागे पडला आहे. मात्र, जेथे कौतुक करणे आवश्यक गरजेचे तेथे ते केले पाहिजेच. आजची तरुण पिढी पुन्हा साहित्य, संगीत आणि कलेच्या दिशेने वळत आहे. ते पुढे म्हणाले, की, आजचे तरुण पुन्हा या गोष्टींकडे वळत आहेत. यामध्ये आमचे कोणतेही योगदान नाही. ते स्वतःहून या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मी अजिबात निराश नाही. येत्या १० ते १५ वर्षांत यामध्ये मोठा बदल पाहायला मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

सलमान खान काय म्हणाला…

‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्यात अभिनेत्री चित्रांगदा सिंह पडद्यावर दिसत आहे. गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. विशेषतः युद्धपटात अशा प्रकारच्या गाण्याचे बोल असण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सलमान खानने या गाण्याचे समर्थन केले होते. सैनिकांना नेहमीच गंभीर आणि देशभक्तीच्या भूमिकेतच का दाखवले जाते, असा सवाल यावर केला होता.

सलमान म्हणाला की “आपल्या सैनिकांना इतके बोअरिंग का समजले जाते? युद्धपटांमधील कथा केवळ युद्धाभोवतीच फिरायला हव्यात का? सैनिकांचे काही स्वतःचे खासगी आयुष्य नसते का? ते सर्व इतके कठोर, कंटाळवाणे आणि प्रेमभावना नसलेले असतात का? मग त्यांना मुले कशी होतात? त्यांच्या आयुष्यात रोमान्स नसतो का? चित्रपटांमध्ये केवळ देशभक्तीचीच गाणी असायला हवीत का? असा सवाल सलमान केला होता.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!