AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांचे SRCC च्या शताब्दी सोहळ्यात आवाहन

पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवार नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या शताब्दी समारंभात संबोधित करताना तरुण पिढीला आवाहन केले.

भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांचे SRCC च्या शताब्दी सोहळ्यात आवाहन
pm modi
| Updated on: Sep 05, 2026 | 9:28 PM
Share

आज भारतीय जगाच्या टॉप कंपन्याचे नेतृत्व करीत आहे. याचा आपल्याला अभिमान वाटत आहे, मग भारताची ग्लोबल कन्सलटन्सी फर्म का नाही बनू शकत? आमची अकाऊंटिंग फर्म, लीगल फर्म, फायनान्स फर्म ग्लोबल लीडर का बनू शकत नाही ? त्यामुळे भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये. हे सर्व शक्य आहे. यासाठी तुमच्याकडे नेटवर्कही आहे आणि नॉलेजही आहे. देशात आता नव्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इको सिस्टीम देखील बनली आहे. आता वेळ मोठे लक्ष्य बनवणे आणि त्यांना प्राप्त करण्याचा आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. नवी दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या शताब्दी समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे व्हीजनच सादर केले.

श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, अर्धा ग्लास भरलेला आहे असे अनेक जण म्हणतात. परंतू आधीच्या सरकारात अर्धा ग्लास रिकामा असल्याचे सांगणारी निराशावादी मनोवृत्ती होती. मी तर उलट म्हणतो पूर्ण ग्लास भरलेला आहे. अर्धा पाण्याने तर अर्धा ग्लास हवेने भरलेला आहे असे म्हणणारा आशावादी आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला तर त्यावेळच्या सरकारने पाकिस्तानला जाब विचारला नाही. परंतू आमचे सरकार आल्यानंतर पाकचे असे करण्याचे साहस होत नाही.  आज दहशतवाद पसरवणारे पूर्णपणे बॅकफूटवर आले आहेत. पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर भारतीय सशस्त्र दले त्यांना त्यांच्या घरात घुसून मारतात. जम्मू-काश्मीरपासून ते ईशान्य भारतापर्यंत शांततेचे वातावरण निर्माण झाले असून हिंसाचारात मोठी घट झाली आहे, असेही ते म्हणाले. देशांतर्गत सुरक्षेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, माओवादी दहशतवाद आणि नक्षलवादाचे कंबरडे पूर्णपणे मोडण्यात सैन्याला आणि प्रशासनाला यश आले आहे असेही ते म्हणाले.

श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आज दहशतवाद पसरवणारे पूर्णपणे बॅकफूटवर आले आहेत. पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले तर भारतीय सशस्त्र दले त्यांना त्यांच्या घरात घुसून मारतात.जम्मू-काश्मीरपासून ते ईशान्य भारतापर्यंत शांततेचे वातावरण निर्माण झाले असून हिंसाचारात मोठी घट झाली आहे, असेही ते म्हणाले.देशांतर्गत सुरक्षेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, माओवादी दहशतवाद आणि नक्षलवादाचे कंबरडे पूर्णपणे मोडण्यात सैन्याला आणि प्रशासनाला यश आले आहे.

एके काळी जो देश ‘धोरणात्मक पंगुत्वामुळे’ चिंतेत होता,  तोच भारत आज आपल्या धोरणात्मक गतिशीलतेमुळे जगभरात चर्चेत आहे. भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली असून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...