Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी या मुंबई बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आवाहन करत सांगितले की, नागरिकांनी स्वेच्छेने सेवा आणि कामकाजातून दूर राहावे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, तर टॅक्सी, ओला आणि उबेर सेवा देखील त्या दिवशी बंद ठेवाव्यात, असे त्यांनी म्हटले. तसेच बेस्टच्या बसेस डेपोतून बाहेर काढू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनानंतर देशभरातून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून प्रतिक्रिया उमटत असून, प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबई बंदच्या घोषणेमुळे या आंदोलनाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jul 21, 2026 05:14 PM
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...