AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!

दाक्षिणात्त्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये नेमका काय फरक आहे? तसेच बॉलिवूडने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून काय शिकायला हवं, याबाबत काजल अग्रवाल या अभिनेत्रीने मनमोकळेपणाने सांगितले.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!
KAJAL AGGARWAL AND SALMAN KHANImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 9:33 PM
Share

Kajal Agrwal : बॉलिवूड आणि दाक्षिणात्त्य सिनेमा यांची नेहमीच तुलना होते. दाक्षिणात्त्य सिनेमांची कथा, त्यांचे चित्रिकरण तसेच दिग्दर्शनाची नेहमीच चर्चा होते. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं चित्रपट समिक्षक नेहमीच म्हणतात. दरम्यान, दाक्षिणात्त्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये नेमका काय फरक आहे? तसेच बॉलिवूडने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून काय शिकायला हवं, याबाबत काजल अग्रवाल या अभिनेत्रीने मनमोकळेपणाने सांगितले. तसेच तिने दिग्गज अभिनेता सलमान खानची एक वाईट सवयही सांगितली आहे.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकायला हवं?

आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या फारशी लाईमलाईटमध्ये नाही. परंतु तिने याआधी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलेले आहे. विशेष म्हणजे आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्मात्यांनी बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई केलेली आहे. याच काजल अग्रवालने शुभांकर मिश्रा यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये नेमकं काय चुकतं याविषयी सविस्तर सांगितलं. “सर्वात पहिली बाब म्हणजे बॉलिवूडने दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीकडून वक्तशीरपणा शिकला पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीत वेळेवक कुठलीच गोष्ट होत नाही. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत मात्र सर्वकाही वेळेवरच करण्याची सवय आहे. मला माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर जायला आवडते. पण बॉलिवूडमध्ये वक्तशीरपणा अजिबात नाही,” अशी खंत काजल अग्रवालने बोलून दाखवली.

सलमान खानने सर्वाधिक वाट पाहायला लावली

तसेच पुढे तुला एखाद्या अभिनेत्यामुळे फार वेळ थांबावं लागलेलं आहे का? असा सवाल तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने थेट सलमान खानचे नाव घेतले. “सलमान खानने मला सर्वाधिक वाट पाहायला लावलेली आहे. मला याची सवय नव्हती. सलमान खान उशिरा यायचा. मला मात्र आश्चर्य वाटायचं. सलमान खान दुपारी किंवा संध्याकाळी यायचा. त्यामुळे मला सेटवरच जीम करावी लागायची. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत असलेल्या वेळ पाळण्याच्या शिस्तीची सवय आहे,” असं काजल अग्रवालने सांगितलं.

तसेच आजकाल महिला कलाकारांना शोभतील असे, व्यापक भूमिका असलेल्या लिखाण चित्रपटांसाठी केले जात आहे, अशी भावनाही तिने व्यक्त केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...