भाजप
भारतीय जनता पार्टी हा देशातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून 2014 पासून केंद्रात सत्तेत आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 1980मध्ये भाजपची स्थापना झाली. 1984मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केवळ दोनच जागा निवडून आल्या. त्यानंतर राम मंदिर आंदोलन सुरू झालं. त्यामुळे भाजपला नवी उभारी मिळाली. 1996मध्ये राम मंदिर आंदोलनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना झाली. त्यानंतर 2004 पर्यंत भाजप सत्तेत राहिली. नंतर दहा वर्ष भाजप सत्तेपासून दूर होती. पण मुख्य विरोधी पक्ष भाजपच होता. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत भाजपने मोठं यश संपादन करून सत्ता मिळवली. केंद्रातील सत्ता काळात भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नोटाबंदी, जीएसटी लागू करणे, पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवणे आणि तीन तलाकबाबतचे निर्णय भाजपने घेतले.
Read MoreNavnath Ban | राऊत आधी जनतेतून निवडून या! भाजप नेते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात
भाजप नेते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था सक्षमपणे हाताळली जात असताना, राऊत राहुल गांधींच्या गुलामगिरीत असल्याचा आरोप बन यांनी केला. 25 वर्षांचे सरकार टिकवण्याची सुपारी कशी फुटली, असा टोलाही त्यांनी लगावला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 3, 2026
- 5:07 pm
राघव चड्ढा यांना मोठा दणका, थेट खासदारकी जाणार? नव्या माहितीने टेन्शन वाढलं
Raghav Chadha : पंजाबमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेदरम्यान भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे नाव मसुदा मतदार यादीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 3, 2026
- 4:29 pm
DJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?
Neelam Gorhe on Vidyanand Bapat: पुण्यातील डीजेविरोधात जाहीर भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच एकाने मारहाण केली. त्याविरोधात समाजातून आणि राजकीय वर्तुळातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 3, 2026
- 1:34 pm
झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर… मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?
CJP-Congress-Modi Government: कॉक्रोच जनता पार्टीसमोर सरकारने सरेंडर केले आहे. आता राम मंदिरातील दानपेटीच्या सुरक्षेसाठी सुद्धा सरकारला कोणी मिळत नसल्याचा आरोप एका बड्या नेत्याने केला आहे. 2029 पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्याने मोठा संकेत दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 3, 2026
- 11:41 am
सर्वात मोठी बातमी ! फडणवीस उपपंतप्रधान होणार? संघात मोठ्या हालचाली; राऊत यांच्या दाव्याने खळबळ
फडणवीस यांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचंच राऊत यांनी म्हटलंय. लवकरच त्याबाबची माहिती समोर येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस उपपंतप्रधान होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगू लागली आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 3, 2026
- 11:46 am
सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी
Sharad Pawar on GDP Growth Rate: देशात विकास वृद्धी दरावरून (GDP) सध्या मोठा वाद उफाळला आहे. एकीकडे सरकार जीडीपीवरून कौतुक सोहळा करत असताना विरोधकांनी ही आकडेवारी सपशेल खोटी असल्याचा दावा केला आहे. या वादात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सरकारला खरी खोटी सुनावली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 3, 2026
- 10:48 am
Maharashtra News LIVE : मराठा अभ्यासकात चर्चा सुरु, जरांगे आता काय निर्णय घेणार ?
Maharashtra News LIVE : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. शहरातील विविध स्मशानभूमीं मधील नादुरुस्त विद्युत दाहिन्यांचा मुद्दा मोरे यांनी सभेत उपस्थित केला.
- Dinananth Parab
- Updated on: Sep 3, 2026
- 7:25 pm
GDP Growth Row : ज्यांच्या मनात GDP च्या 7.8% ग्रोथवर प्रश्न, सरकारने दिलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
GDP Growth Row : जीडीपीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. GDP च्या 7.8% ग्रोथवर विरोधकांनी हल्ला चढवला आहे. हा आकडा साफ खोटा असल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून करण्यात आला आहे. आता सरकारने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 3, 2026
- 8:59 am
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. दुसरीकडे, ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांची याचिका फेटाळली आहे, ज्यामुळे प्रिया सरवणकर यांना नगरसेवकपद मिळण्याची शक्यता आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 3, 2026
- 8:01 am
GDP ची बिअर मगशी तुलना, भारताच्या विकास दरावरून घमासान, काँग्रेस आणि भाजप भिडले
GDP Congress BJP : भारताच्या विकास दरावर विरोधकांनी मोठा सवाल केला आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, पीएनजी, सीएनजीसह अत्यावश्यक वस्तू महागल्या आहेत. अशी स्थिती असताना जीडीपीच्या आकडेवारीवर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. तर त्यावर भाजपने पलटवार केला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 3, 2026
- 7:44 am
एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सव सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी; नाथाभाऊंनी एका वाक्यात विषय संपवला, पहिली प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सव मोठ्या धुमधडक्यात साजरा झाला. विरोधी पक्षाचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र भाजप नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, त्यावर आता खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Sep 2, 2026
- 3:01 pm
केंद्रात लवकरच मोठा उलटफेर… गडकरींची ट्रान्स्फर, तरुणांना संधी, महाराष्ट्रातून कुणाची वर्णी? नवी अपडेट काय?
केंद्र सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. यात अनेक जुन्या मंत्र्यांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. नितीन गडकरींच्या खात्यात बदल होण्याची शक्यता असून, रिक्त १२ मंत्रिपदे भरली जातील. २०२७ विधानसभा आणि २०२९ लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 2, 2026
- 2:53 pm