Gopichand Padalkar | रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
ऐतिहासिक वास्तू असलेल्या रायगड किल्ल्यावरील होळी माळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संपूर्ण परिसर अंधारात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान होळी माळ परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याचे आढळून आले.
ऐतिहासिक वास्तू असलेल्या रायगड किल्ल्यावरील होळी माळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह संपूर्ण परिसर अंधारात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान होळी माळ परिसरात पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याचे आढळून आले. तसेच जगदीश्वर मंदिर आणि महाराजांच्या समाधीस्थळ परिसरातही अंधार असल्याचे पडळकर यांनी निदर्शनास आणून दिले. माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, “महाराजांचा रायगड अंधारात असणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हे आपल्या सर्वांसाठी वेदनादायक असून अजिबात शोभणारं नाही.” याबाबत संबंधित जबाबदार यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण परिसरात योग्य ती लाईट व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, रायगडावरील ऐतिहासिक स्थळांच्या देखभालीबाबत प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Feb 16, 2026 01:16 PM
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या

