AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe Robbery: तुकाराम मुंडे यांच्या घरावर दरोडा, नाम साधर्म्यामुळे यंत्रणा गडबडल्या, दिव्यात नेमकं घडलं काय?

Diva Tukaram Mundhe House Robbery:ठाणे जिल्ह्यातील दिवा शहरात पहाटेच्या सुमाराला दरोडा पडला. पण त्यानंतर यंत्रणांसह सर्वांचाच गोंधळ उडाला. नाम साधर्म्यामुळे यंत्रणा गडबडल्या. दिवा शहरातील घटना नेमकी काय आहे?

Tukaram Mundhe Robbery: तुकाराम मुंडे यांच्या घरावर दरोडा, नाम साधर्म्यामुळे यंत्रणा गडबडल्या, दिव्यात नेमकं घडलं काय?
तुकाराम मुंडे यांच्या घरावर दरोडा, नाम साधर्म्यामुळे यंत्रणा गडबडल्या, दिव्यात नेमकं घडलं काय?
| Updated on: Nov 18, 2026 | 6:34 AM
Share

Diva Tukaram Mundhe House Robbery: ठाण्यातील दिवा शहरात मंगळवारी पहाटे तुकाराम मुंढे यांच्या घरावर दरोडा पडला. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली. डॅशिंग सनदी अधिकारी आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याच घरी चोरी झाली की काय? असा समज झाला. सोशल मीडियावर ही वार्ता व्हायरल झाली. नाम साधर्म्यामुळे यंत्रणाही गडबडल्या. उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. पण पोलिसांच्या माहितीनंतर खरा प्रकार समोर आला. नावामधील साधर्म्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे समोर आले. दरोडा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी नाही तर उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या घरावर पडल्याचे स्पष्ट झाले.

नामसाधर्म्यामुळे गोंधळ, सोशल मीडियावर चर्चांना ऊत

दिवा शहरातील आगासनगाव परिसरात स्थानिक उद्योजक तुकाराम सत्यवान मुंडे यांचा बंगला आहे. मंगळवारी पहाटे त्यांच्या घरावर दरोडा पडला. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी बंगल्यात दरोडा घातला. घरातील 2.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख असा ऐवज चोरला. पण IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाशी साधर्म्य असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. तर FDA आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या परिसरात राहत असताना आपल्याला माहिती कसं नाही असा प्रश्न अनेकांना पडला. पोलिसांनी तपासाअंती सर्व माहिती समोर आणल्यानंतर मग खरा प्रकार समोर आला.

मुंब्रा पोलिसांची घटनास्थळी धाव

दरोड्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पण नामसाधर्म्यामुळे यंत्रणाही गडबडून गेली होती. स्थानिक उद्योजक तुकाराम मुंढे यांच्या घरी हा दरोडा पडल्याचे समोर आले.  या प्रकरणात घरातील 2.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.  याप्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?