AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crorepati Family Jain Diksha: संपत्तीचा मोह सोडला, संसाराचा त्याग केला! मुलींसह संन्यास घेणार करोडपती जैन कुटुंब

उदयपूरच्या जसवंतगडमधील एक श्रीमंत कुटुंब अचानक आपली संपत्ती सोडून संन्यास घेणार आहे. केवळ आई-वडीलच नव्हे, तर त्यांच्या दोन तरुण मुलीसुद्धा सांसारिक आसक्तीचे सर्व बंध तोडून ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारत आहेत. फेब्रुवारी २०२७ रोजी हे संपूर्ण कुटुंब संन्यासी बनेल.

Crorepati Family Jain Diksha: संपत्तीचा मोह सोडला, संसाराचा त्याग केला! मुलींसह संन्यास घेणार करोडपती जैन कुटुंब
| Updated on: Nov 17, 2026 | 3:18 PM
Share

Crorepati Family Jain Diksha:  एक हसत- खेळंत कुटुंब, कोट्यवधींची पॉपर्टी, सर्वसुखसोई अन् अक्षरश: पायाशी लोळण घेणारं ऐश्वर्य… माणसाला आयुष्यात आणखी काय हवं असतं. अशाच ऐश्वर्यसंपन्न कुटुंबाने ही सर्व संपत्ती, ऐशोरामी आयुष्य मागे सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऐकून विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. उदयपूरच्या जसवंतगडमधील एक श्रीमंत कुटुंब अचानक आपली संपत्ती सोडून संन्यास घेणार आहे. केवळ आई-वडीलच नव्हे, तर त्यांच्या दोन तरुण मुलीसुद्धा सांसारिक आसक्तीचे सर्व बंध तोडून ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारत आहेत. फेब्रुवारी 2027 रोजी हे संपूर्ण कुटुंब संन्यासी बनेल.

१५ कोटींच्या उलाढालीपासून ते संन्यासापर्यंत..

ही चक्रावणारी कहाणी आहे दिलीपभाई भोगर यांची. जे एकेकाळी आपले नशीब आजमावण्यासाठी राजस्थानच्या एका छोट्या गावातून सुरतला स्थलांतरित झाले होते. त्यांनी कापड व्यवसायात रात्रंदिवस काम करून १५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल उभारली. सुरतच्या प्रमुख कापड बाजारात त्यांची तीन दुकाने होती. पण आता दिलीप भाई (47), त्यांची पत्नी ज्योतीबेन (45), मोठी मुलगी छबी (22) आणि धाकटी मुलगी चार्वी (14) हे सर्व 8 फेब्रुवारी 2027 रोजी सुरतमध्ये एकत्र जैन दीक्षा घेणार आहेत.

मुलीने आधीच घेतलाय संन्यास…

या कुटुंबात संन्यासाची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. दिलीप भाईंची एक मुलगी, शैली, २०२३ मध्ये घर सोडून गेली आणि आता ती साध्वी दर्शिता म्हणून ओळखली जाते. आपल्या लाडक्या मुलीला ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारताना पाहून वडिलांचे मन हळूहळू बदलले. कालपर्यंत आपला व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दिलीप भाईंनी अचानक आपला व्यवसाय गुंडाळायला सुरुवात केली.

मुलींना करिअर घडवण्यासाठी आणि आयुष्य जगण्यासाठी उत्तम संधी होत्या. मोठी मुलगी, छबीने ग्राफिक डिझाइनचे शिक्षण घेतले होते आणि क्रोशे कलेत एक यशस्वी व्यवसायही सुरू केला होता. सर्वात धाकटी मुलगी, चार्वी, पूर्वी फुटबॉलपटू होती आणि सुरतमध्ये जिल्हा स्तरावर खेळायची. पण त्यांची धर्माप्रती असलेली भक्ती इतकी प्रबळ होती की, छवीने नोकरी सोडली आणि चार्वीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्यासाठी नववीतच शाळा सोडली.

कुटुंबावर एक आघात अन..

या मोठ्या निर्णयामागे एक मन हेलावणारी कहाणी आहे. दिलीप भाईंच्या पत्नी, ज्योतीबेन सांगतात की, काही काळापूर्वी त्यांच्या पतीचा एक खूप धोकादायक अपघात झाला होता. दिलीप भाईंचा जीव वाचणे अत्यंत कठीण होते, पण त्यांच्या गुरूंच्या आणि देवाच्या कृपेने ते पूर्णपणे सुखरूप घरी परतले. या घटनेने कुटुंबाचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांना जाणीव झाली की हे सांसारिक जीवन तात्पुरते आहे.

Follow Us
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?