AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga Tips: थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी रोज करा ‘ही’ योगासनं; शरीराला मिळतात अनेक फायदे

Yoga for Thyroid: थायरॉईडच्या समस्येमुळे वजन वाढणे, थकवा जाणवणे आणि केसगळती यांसारखे त्रास होऊ शकतात. नियमित योगासने केल्याने शरीर निरोगी ठेवण्यास आणि थायरॉईडचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या थायरॉईडसाठी फायदेशीर ठरणारी सोपी योगासने.

Yoga Tips: थायरॉईडचा त्रास कमी करण्यासाठी रोज करा ‘ही’ योगासनं; शरीराला मिळतात अनेक फायदे
| Edited By: | Updated on: Nov 17, 2026 | 3:12 PM
Share

आजकाल बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता ताण यामुळे अनेकांना थायरॉईडच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. थायरॉईडचा त्रास झाल्यास शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत सुस्ती आणि थकवा जाणवणे, केस गळणे तसेच इतर शारीरिक बदल दिसून येऊ शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडची समस्या अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घेणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांसोबत योगासनांचाही दिनक्रमात समावेश करता येतो. काही योगासने शरीराची लवचिकता वाढवण्यास, ताण कमी करण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया, थायरॉईडचा त्रास असताना कोणती सोपी योगासने फायदेशीर ठरू शकतात.

उज्जायी ज्या महिलांना थायरॉईडची समस्या आहे त्या या प्रकारचा योग अगदी सहज करू शकतात. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. उज्जयी प्राणायाम करण्यासाठी सर्वप्रथम श्वास घशात भरून ओमचा जप करावा. असे म्हटले जाते की अशा प्रकारे थायरॉईड ग्रंथीला विश्रांती मिळते आणि ती सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते. हे दररोज ८-१२ वेळा करता येते. सुरुवातीला तुम्ही ते कमी वेळा करण्याचा प्रयत्न करा.

कपालभाती कपालभाती हा अतिशय लाभदायक योग आहे. हे केल्याने रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण पोटाचे स्नायूही मजबूत होतात. त्याचबरोबर शरीरातील सर्व अशुद्ध घटक बाहेर पडतात आणि थायरॉईडपासून मुक्त होण्यास मदत होते.

भ्रस्त्रिका प्राणायाम भ्रस्त्रिका प्राणायाम करण्याचे तीन मार्ग आहेत. या तीन प्रकारे हळूहळू सराव करण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम द्रुत श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्यानंतर सुमारे अडीच सेकंद श्वास घ्या आणि अडीच सेकंद धरून ठेवा. मग श्वास सोडा. अडीच सेकंद श्वास रोखून ठेवण्याचा सराव झाल्यावर साधारण पाच सेकंद श्वास घ्या आणि पाच सेकंद श्वास रोखून धरा. हे आसन सतत पाच मिनिटे करा.

सर्वांगासन हे आसन केल्याने थायरॉईड ग्रंथीवर दबाव येतो आणि ती व्यवस्थित काम करू लागते. तसेच हा योग केल्याने मज्जासंस्था देखील व्यवस्थित काम करते. ज्यामुळे पिट्यूटरी ग्रंथी आणि पाइनल ग्रंथी थायरॉईड ग्रंथींवर योग्य नियंत्रण ठेवतात आणि थायरॉईडची समस्या कमी होते.

Follow Us
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?