AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल

Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल

| Updated on: Nov 17, 2026 | 2:18 PM
Share

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एपस्टाईन फाईल्स महाराष्ट्र चित्रपटाच्या प्रदर्शनावरून रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीमुळे सेन्सॉर बोर्डाला अडचणी येत असल्याचे सय्यद यांनी म्हटले. महिला शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी विरोध केला जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

एपस्टाईन फाईल्स महाराष्ट्र या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांनी केलेल्या ट्रेडमार्क नोंदणीमुळे सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सय्यद यांनी म्हटले आहे.

दिपाली सय्यद यांनी नमूद केले की, “महिलांचे शोषण करणाऱ्यांविरोधात आम्ही चित्रपट बनवत आहोत. त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांनी आम्हाला पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी त्यांच्याकडून या चित्रपटाला अडथळा निर्माण केला जात आहे.” ट्रेडमार्कच्या मुद्द्यावर बोलताना सय्यद यांनी साड्या किंवा सामान्य नावांवर ट्रेडमार्क करणे हे अयोग्य असल्याचे म्हटले. सेन्सॉर बोर्डातही चित्रपटाविरोधात दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कामांना आणि समाजासमोर सत्य आणणाऱ्या गोष्टींना कोणीही थांबू शकत नाही, असा विश्वास दिपाली सय्यद यांनी व्यक्त केला. चित्रपटावर टीका करण्याआधी तो पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Nov 17, 2026 02:18 PM

Follow Us