AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या बर्फवृष्टीचा घ्या आनंद! नोव्हेंबरमध्ये ‘या’ 6 ठिकाणी पाहायला मिळेल स्नोफॉल, फिरण्याचा करा प्लॅन

काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांमध्ये नोव्हेंबर महिन्यातच ताजी बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यापूर्वीच नोव्हेंबर हा डोंगराळ भागात फिरण्यासाठी आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी उत्तम महिना आहे.

पहिल्या बर्फवृष्टीचा घ्या आनंद! नोव्हेंबरमध्ये 'या' 6 ठिकाणी पाहायला मिळेल स्नोफॉल, फिरण्याचा करा प्लॅन
नोव्हेंबरमध्ये 'या' 6 ठिकाणी पाहायला मिळेल स्नोफॉलImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 17, 2026 | 3:16 PM
Share

स्नोफॉल पाहण्याचा आणि बर्फाच्छादित डोंगरांमध्ये फिरण्याचा अनुभव काही औरच असतो. पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या पर्वतरांगा आणि थंडगार वातावरणामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच हिमालयातील अनेक भागांमध्ये ताजी बर्फवृष्टी झाली आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणे बर्फाने नटली आहेत. तुम्हालाही डिसेंबरमधील गर्दी टाळून बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर या ठिकाणांना भेट देऊ शकता.

गुलमर्ग, काश्मीर

जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग हे बर्फवृष्टीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. १२ नोव्हेंबर रोजी येथील उंच पर्वतरांगांवर ताजी बर्फवृष्टी झाली. हिवाळ्यात येथील हिरवीगार कुरणे आणि डोंगर बर्फाने झाकलेले दिसतात. गोंडोला राइडचा आनंदही येथे घेता येतो.

गुरेझ व्हॅली, काश्मीर

उत्तर काश्मीरमधील गुरेझ व्हॅली थंडीच्या दिवसांत अतिशय सुंदर दिसते. १२ नोव्हेंबर रोजी येथील उंच भागांमध्ये बर्फवृष्टी झाली होती. मात्र, हिवाळ्यात येथे पोहोचणे कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रवासापूर्वी रस्त्यांची स्थिती तपासून घ्या.

सोनमर्ग, काश्मीर

सोनमर्ग हे सुंदर डोंगररांगा आणि निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. नोव्हेंबरमध्ये येथील उंच भागांमध्ये ताजी बर्फवृष्टी झाली. मात्र, संपूर्ण पर्यटनस्थळ बर्फाने झाकलेले असेलच असे नाही. त्यामुळे जाण्यापूर्वी हवामान आणि रस्त्यांची माहिती घ्या.

स्पिती व्हॅली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. येथील उंच भागांमध्ये लवकरच थंडी जाणवू लागते. डोंगरांवर बर्फवृष्टी झाल्यानंतर येथील निसर्ग अधिकच सुंदर दिसतो. मात्र, बर्फामुळे रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होऊ शकते.

रोहतांग पास, मनाली

मनालीजवळील रोहतांग पास येथे १३ नोव्हेंबर रोजी ताजी बर्फवृष्टी झाली होती. उंचावरून दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. मात्र, बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे प्रवासापूर्वी प्रशासनाच्या अधिकृत सूचना तपासा.

मरही, हिमाचल प्रदेश

मनाली-रोहतांग मार्गावरील मरही हे छोटेसे ठिकाण आहे. येथेही १३ नोव्हेंबर रोजी बर्फवृष्टी झाली होती आणि सुमारे एक इंच बर्फ साचला होता. रोहतांग पासकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे थांब्याचे ठिकाण आहे. मात्र, येथे जाण्यापूर्वी रस्त्यांची स्थिती तपासणे आवश्यक आहे.

Follow Us
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?