स्वाती वेमूल TV9 Marathi च्या डिजिटल विभागात सीनिअर सब एडिटर म्हणून काम करते. ती प्रामुख्याने मनोरंजन विभागातील घडामोडींविषयीच्या बातम्या करते. त्याशिवाय ती ट्रेंडिंग, ट्रॅव्हल, आंतरराष्ट्रीय या विभागांशी निगडीत विविध बातम्या करते. स्वातीला पत्रकारितेत नऊ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यापैकी तीन वर्षे तिने वृत्तवाहिनीत काम केलंय. तर गेल्या सहा वर्षांपासून ती डिजिटल विभागात प्रामुख्याने मनोरंजन कॅटेगरीसाठी काम करतेय. एंटरटेन्मेंट विषयक बातम्या, सेलिब्रिटींच्या मुलाखती, विशेष लेख आणि चित्रपट-वेब सीरिज समीक्षण हा तिच्या कामाचा मुख्य भाग आहे.
स्वातीने डिजिटल विभागातील कामाची सुरुवात ‘लोकसत्ता’ या वेबसाइटपासून केली. ‘लोकसत्ता’मधील ‘डिजिटल अड्डा’ हा मुलाखतींचा कार्यक्रम स्वातीने सुरू केला आणि त्याला युट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘लोकसत्ता’ आणि ‘सकाळ’ या दोन्ही वेबसाइट्सच्या ‘एंटरटेन्मेंट’ विभागासाठी स्वातीने काम केलं. ‘एंटरटेन्मेंट’ विभागासाठी काम करत असतानाच तिला सोशल मीडियावरील बदलता ट्रेंड आणि त्याबाबतच्या नवनव्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची, अभ्यास करण्याची विशेष आवड आहे.
महिमा चौधरीने 62 वर्षीय अभिनेत्याशी केलं लग्न? एकमेकांना घातल्या वरमाळा, व्हिडीओ पाहून चक्रावले नेटकरी
अभिनेत्री महिमा चौधरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका व्यक्तीच्या गळ्यात वरमाळा घालताना पहायला मिळतेय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 8:34 pm
देवाला सतत सांगत होते..; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने का मानले दत्त महाराजांचे आभार?
'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेनं 1000 भागांचा मोठा टप्पा गाठला आहे. यानिमित्त मालिकेत सायलीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने काही खास आठवणी सांगितल्या आहेत. या मालिकेला तिने होकार का दिला, हेसुद्धा तिने सांगितलं.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 8:11 pm
समर-स्वानंदीमध्ये गोड तू तू मैं मैं; प्रेक्षक म्हणाले ‘पहिल्यांदा काहीतरी चांगलं..’
अधिरा आणि स्वानंदीच्या नव्या आयुष्यात काय बदल बघायला मिळणार, हे मालिकेच्या पुढील भागात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 4:41 pm
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
अर्जुन आणि गॅब्रिएला यांना दोन मुलंसुद्धा आहेत | Arjun Rampal girlfriend Gabriella Demetriades catches everyones attention
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 4:19 pm
धर्मेंद्र यांच्याबद्दल ‘ही’ एक गोष्ट Google वर सर्वाधिक होतेय सर्च, जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
गुगलवर वर्षभर सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं, याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 2025 या वर्षांत धर्मेंद्र यांच्याविषयीची एक गोष्ट गुगलवर नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केली. ही कोणती गोष्ट, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 3:56 pm
समंथाने संसार मोडला? राज निदिमोरुच्या पूर्व पत्नीने सोडलं मौन; म्हणाली ‘रात्रभर झोप नाही, तळमळत..’
समंथा आणि राज निदिमोरू यांच्या लग्नाबद्दल अखेर त्याच्या पूर्व पत्नीने मौन सोडलं आहे. श्यामली डे हिनं इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित यावर प्रतिक्रिया दिली आहे. श्यामली आणि राज यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला होता.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 3:23 pm
Dhurandhar First Review: क्षणोक्षणी थरार अन् थक्क करणारे ट्विस्ट; ‘धुरंधर’चा पहिला रिव्ह्यू समोर
'धुरंधर' या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन यांच्या भूमिका आहेत. वास्तविक कथेवर हा चित्रपट आधारित असल्याचं कळतंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 1:17 pm
तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल, “निवडून दिलं म्हणजे सगळे…”
कुंभमेळ्यासाठी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का, असा सवाल त्यांनी केला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 12:03 pm
‘शाळा मराठी’ची जोरदार चर्चा; छत्रपती संभाजीनगरच्या या चिमुकल्या किर्तनकाराने गायलं गाणं
‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता त्यातील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. मराठी शाळांची आठवणी जागं करणारं हे गाणं चिमुकल्या कीर्तनकाराने गायलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 11:39 am
संत काळे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप
वर्ध्यातील खरांगणा (मोरांगणा) इथं संत काळे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप झाला. पालखी, दिंडी मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला. अनेक भाविकांनी महाराजांच्या समाधीवर चादर चढवली. तर पालखीची ठिकठिकाणी पूजासुद्धा करण्यात आलीय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 10:58 am
वाघोलीजवळ कार अपघाताचा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथील एका पेट्रोल पंपासमोर भरधाव कार उलटी होऊन महामार्गावर फरफटत गेल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 10:51 am
लग्नाच्या 2 दिवसांनंतर समंथाने पती राजसाठी लिहिली अशी पोस्ट; भानगड काय?
लग्नाच्या दोन दिवसांनंतर समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलेल्या एका कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. राज निदिमोरूसोबतच्या लग्नातील फोटो तिने शेअर केला आहे आणि त्यावर तिने हे कॅप्शन लिहिलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 4, 2025
- 10:19 am