AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED Live Streaming : टीम इंडियाचा नेदरलँड्स विरुद्धचा सामना किती वाजता? जाणून घ्या वेळ

India vs Netherlands T20 World Cup 2026 Live Match Score : टीम इंडियाने आतापर्यंत या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात गतविजेता म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकले आहेत. आता टीम इंडिया नेदरलँड्स विरुद्ध भिडणार आहे.

IND vs NED Live Streaming : टीम इंडियाचा नेदरलँड्स विरुद्धचा सामना किती वाजता? जाणून घ्या वेळ
India vs NetherlandsImage Credit source: @KNCBcricket and Bcci X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 17, 2026 | 11:32 PM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग 3 सामने जिंकून विजयी हॅट्रिक पूर्ण केली. इंडियाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये असोसिएट टीमला पराभूत केल. भारताने यूएसएला पराभूत करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाने नामिबियावर सहज विजय मिळवला. तर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवलं. भारताने परंपरेनुसार पाकिस्तान विरुद्ध सहज आणि सोपा विजय मिळवला. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील आठवा विजय ठरला. भारताने या विजयासह सुपर 8 मधील प्रवेश निश्चित केला.

आता टीम इंडिया साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेत साखळी फेरीतील शेवटचा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल? सामन्याला किती वाजता सुरुवात होईल? हे आपण सविस्त जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना बुधवारी 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे बघायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

नेदरलँड्सची कामगिरी

नेदरलँड्सने टी 20i वर्ल्ड कप आणि टी 20i क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याचा इतिहास आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला लोळवलं आहे. मात्र नेदरलँड्सला यंदा तसं काही खास करता आलेलं नाही. नेदरलँड्सने साखळी फेरीत 3 पैकी 1 सामना जिंकला आहेत. नेदरलँड्सला यूएसए आणि पाकिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. तर नेदरलँड्सने एकमेव सामना हा नामिबिया विरुद्ध जिंकला आहे.आता नेदरलँड्स टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...