भारतीय पुरूष क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट पुरुष संघ जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा पूर्ण सदस्य आहे. टीम इंडिया जागतिक क्रिकेटमधील 1 हजारापेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळणाऱ्या काही मोजक्या संघांपैकी हा एक आहे. भारतीय क्रिकेट संघाला सध्या 1800 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. भारताने 1983 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. तर 2007 आणि 2024 मध्ये टी20 वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. भारताने तसेच 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय. भारताने 2002 साली श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर केली होती. भारताने 2013 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच 2025 मध्ये रोहित शर्माने भारताला पुन्हा एकदा चॅम्पिटन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं. भारतीय क्रिकेटचं नियंत्रण बीसीसीआयच्या हातात आहे.
Read Moreवनडेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२०चा थरार रंगणार! 6 ऑक्टोबरला पहिला सामना, टीम इंडियात 9 मोठे बदल होणार
India vs West Indies T20 Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांची टी२० मालिका ६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. प्लेइंग ११ बाबतही माहिती समोर आली आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 4, 2026
- 4:13 pm
Asian Games 2026: जापानला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाच्या किटमध्ये घोळ; BCCI वर स्वतः हॉटेल बुक करण्याची वेळ का आली?
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी जपानला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू योग्य मापाच्या किटची वाट पाहत आहेत. भारतीय संघ रविवारी जपानसाठी उड्डाण करणार आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 19, 2026
- 5:05 pm
IND U19 vs AUS U19: वडिलांसमोरच आर्यवीरने दाखवला सेहवाग अंदाज; 5 चौकार मारल्यानंतर केली चूक
IND Under-19 vs AUS Under-19: आर्यवीर सहवागने भारतीय संघासाठी आपल्या पदार्पणाच्या डावात 26 चेंडूंत 28 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने 5 उत्कृष्ट चौकार लगावले. हा सामना पाहण्यासाठी खुद्द वीरेंद्र सेहवाग मैदानात उपस्थित होता.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 18, 2026
- 5:45 pm
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टेन्शन! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेन्यू बदलणार? जाणून घ्या काय आहे कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खराब प्रकाश आणि थंडीमुळे या मालिकेच्या प्रस्तावित वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 18, 2026
- 5:26 pm
नितीश रेड्डीचा नादच खुळा! T20 मालिकेत 4 वेळा अशी केली शिकार; आसपासही नाही कोणताही बॉलर
भारत विरुद्ध अफगाणिस्तान: या टी20 मालिकेचा खरा स्टार अभिषेक शर्मा ठरला, ज्याने आपल्या बॅटने मैदानावर जोरदार धुमाकूळ घातला. मात्र, नितीश कुमार रेड्डीनेही आपल्या गोलंदाजीने गहिरी छाप पाडत या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 18, 2026
- 4:09 pm
IND vs AFG तिसर्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, संघात फक्त एकच बदल; अशी आहे प्लेइंग 11
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने संघात एकच बदल केला आहे. हा बदल काय आहे ते समजून घ्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 17, 2026
- 7:20 pm
रोहितशी पंगा पडला महाग? अजित आगरकरची गच्छंती नक्की? अध्यक्षपदासाठी दोन माजी खेळाडूंची नावे शर्यतीत
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत असून बीसीसीआय त्यांचा करार वाढवण्याच्या विचारात नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती यांच्यातील वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 17, 2026
- 4:52 pm
IND vs WI: वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्माबाबत मोठा निर्णय
वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे मालिकेत रोहित शर्माच्या निवडीबाबत पेच होता. त्यामुळे या संघात आहे की नाही? याबाबत चर्चा होती. अखेर हा प्रश्न सुटला असून त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 16, 2026
- 9:38 pm
ICC Rankings: अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला टाकले मागे; आता इशान किशनचं आव्हान!
आयसीसीची टी20 फॉर्मेटची नवी क्रमवारी समोर आली आहे. या क्रमवारीत अभिषेक शर्माला जबरदस्त फायदा झाला आहे. त्याने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला मागे टाकलं आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 16, 2026
- 4:54 pm
वैभव सूर्यवंशीची एन्ट्री अन् या खेळाडूचा बळी? तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार अय्यरच्या मनात आहे तरी काय?
भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची टी20 मालिका पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर 2-0 ने खिशात घातली आहे. आता तिसरा सामना औपचारिक असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाण्याची शक्यता वाढली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 16, 2026
- 2:57 pm
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर बाहेर, एशियन गेम्ससाठी या युवा खेळाडूला लागली लॉटरी
भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आगामी आशियाई खेळांमधूनहीबाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेत त्याच्या जागी उत्तर प्रदेशचा युवा लेग स्पिनर आणि अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 16, 2026
- 2:18 pm
IND vs AFG 2nd T20I: भारताने अफगाणिस्तानला 159 धावांवर रोखले; पहिल्या डावात असं घडलं
दुसऱ्या टी20 सामन्यातही भारताने अफगाणिस्तानला 159 धावांवर रोखलं. त्यामुळे हे आव्हान भारतासाठी गाठणं काही कठीण नाही. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 15, 2026
- 9:16 pm