SA vs NZ, T20 Semi Final Score Updates In Marathi : न्यूझीलंडची अंतिम फेरीत धडक, दक्षिण अफ्रिकेचा प्रवास संपला
SA vs NZ T20 world cup live updates and highlights in Marathi : टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा दारून पराभव केला. या सामन्यात दक्षिण अफ्रिका पूर्णपणे हतबल असल्याचं दिसून आलं. न्यूझीलंडने फक्त 1 विकेट गमावला आणि दिलेलं 170 धावांचं आव्हान गाठलं.

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला फलंदाजी आली आणि 170 धावांचं आव्हा ठेवलं. हे आव्हान न्यूझीलंडने 12.5 षटकात 1 गडी गमवून सहज पूर्ण केलं. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा संघ कुठेच दिसला नाही. संपूर्ण स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली होती. पण शेवटच्या टप्प्यात नांगी टाकल्याने दक्षिण अफ्रिकेचा प्रवास संपला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही दक्षिण अफ्रिका चोकर्सचा डाग पुसू शकला नाही.
LIVE Cricket Score & Updates
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : दक्षिण अफ्रिका पुन्हा चोकर्स, न्यूझीलंड अंतिम फेरीत
दक्षिण अफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत विजयी घोडदौड कायम होती. मात्र उपांत्य फेरीत नांगी टाकली. न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह न्यूझीलंडचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा पोहोचला आहे. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 170 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने 12.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. आता अंतिम सामन्यात भारत की इंग्लंड यांची उत्सुकता असणार आहे. फिन एलेन या सामन्यात वेगवान शतक ठोकलं. शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि 33 चेंडूत शतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 303.03 चा होता.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी नांगी टाकली
न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा संघ कुठेच दिसला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही दक्षिण अफ्रिकेचा प्रवास संपणार असं दिसत आहे.
-
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : न्यूझीलंड फायनलच्या दिशेने, दक्षिण आफ्रिका पिछाडीवर
न्यूझीलंडने फायनलच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील सामन्यात 170 धावांचा पाठलाग करताना 137 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून धावा केल्या आहेत. रचीन रवींद्र 12 आणि फिन एलन 65 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : क्लिन बोल्ड, रबाडाकडून सेट जोडी ब्रेक, न्यूझीलंडला पहिला झटका
कगिसो रबाडा याने न्यूझीलंडची सेट जोडी फोडली आहे. रबाडाने टीम सायफर्ट याला क्लिन बोल्ड केला. सायफर्टने 33 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. सायफर्ट आणि फिन एलन या सलामी जोडीने 170 रन्सचा पाठलाग करताना 9.1 ओव्हरमध्ये 117 रन्सची भक्कम पार्टनरशीप केली.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : टीम सायफर्टचं 28 बॉलमध्ये अर्धशतक, न्यूझीलंड मजबूत स्थितीत
टीम सायफर्ट याने 28 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर न्यूझीलंडने 170 धावांचा पाठलाग करताना 8 ओव्हरमध्ये बिनबाद 103 धावा केल्या आहेत. फिन एलन 45 तर टीम सायफर्ट 57 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : न्यूझीलंडची कडक सुरुवात, 6 ओव्हरमध्ये 84 धावा, दक्षिण आफ्रिका पिछाडीवर
फिन एलेन आणि टीम सायफर्ट या सलामी जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना पूर्णपणे एकतर्फी केला आहे. या सलामी जोडीने 170 धावांचा पाठलाग करताना पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 84 धावा जोडल्या आहेत. सायफर्ट 41 आणि एलन 43 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या सामन्यात फार पिछाडीवर गेला आहे. तर न्यूझीलंडने सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : न्यूझीलंडच्या सलामी जोडीची कडक सुरुवात, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई
टीम सायफर्ट आणि फिन एलन या सलामी जोडीने न्यूझीलंडला जबरदस्त अशी सुरुवात करुन दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 170 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. त्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या सलामी जोडीने 3 ओव्हरमध्ये बिनबाद 37 धावा जोडल्या आहेत.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात, सायफर्ट-एलन मैदानात,170 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्ट आणि फिन एलन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. दक्षिण आफ्रिेकेने न्यूझीलंडसमोर 170 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : मार्को यान्सनेची निर्णायक खेळी, न्यूझीलंडसमोर 170 रन्सचं टार्गेट
दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडसमोर 170 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेटस् गमावून 169 रन्स केल्या. न्यूझीलंडसाठी मार्को यान्सेन याने सर्वाधिक धावा केल्या. यान्सेनने 30 बॉलमध्ये नॉट आऊट 55 रन्स केल्या. तसेच डेवाल्ड ब्रेव्हीस याने 34 तर ट्रिस्टन स्टब्स याने 29 रन्स केल्या. तर मॅट हेनरी, रचीन रवींद्र आणि कोल मॅककोन्ची /या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : ट्रिस्टन स्टब्स आऊट, न्यूझीलंडला निर्णायक क्षणी विकेट
लॉकी फर्ग्यूसन याने दक्षिण आफ्रिकेला निर्णायक क्षणी मोठा झटका दिला आहे. फर्ग्यूसन याने स्फोटक फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याला बोल्ड केलं आहे. ट्रिस्टनने 24 बॉलमध्ये 29 रन्स केल्या.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : ट्रिस्टन स्टब्स-मार्को यान्सेनवर मोठी जबाबदारी, न्यूझीलंड विरुद्ध किती धावा करणार?
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्ध 5 विकेट्स गमावून 14 ओव्हरमध्ये 101 रन्स केल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स-मार्को यान्सेन ही जोडी मैदानात खेळत आहे. ट्रिस्टन स्टब्स 7 आणि मार्को यान्सेन 17 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेची पडझड, सेट डेवाल्ड ब्रेव्हीस आऊट, न्यूझीलंकडून पाचवा झटका
जेम्स निशाम याने दक्षिण आफ्रिकेला 11 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर पाचवा झटका देत आपली पहिली वैयक्तिक विकेट मिळवली. निशामने सेट डेवाल्ड ब्रेव्हीस याला कॅप्टन मिचेल सँटनर याच्या हाती कॅच आऊट केलं. ब्रेव्हीस याने 34 धावा केल्या.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : किलर मिलर आऊट, दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका देत बॅकफुटवर ढकललं आहे. रचिन रवींद्र याने मिलरला दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर डॅरेल मिचेल याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 10 ओव्हरमध्ये 77 वर 4 आऊट अशी स्थिती झाली आहे.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : कॅप्टन एडन मार्करम आऊट, दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला तिसरा आणि सर्वात मोठआ झटका दिला आहे. रचीन रवींद्र याने आपल्या बॉलिंगवर सामन्यातील आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एडनला डॅरेल मिचेल याच्या हाती कॅच आऊट केलं. एडनने 20 बॉलमध्ये 18 रन्स केल्या.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : मार्करम आणि ब्रेव्हीसने दक्षिण आफ्रिकेला सावरलं, किती धावा?
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं. मात्र त्यानंतर कॅप्टन एडन मार्करम याने डेवाल्ड ब्रेव्हीस याच्याह तिसऱ्या विकेटसाठी चिवट भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला आहे. दक्षिण आफ्रिकेने 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 48 धावा केल्या आहेत.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Score Updates : न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच ओव्हरमध्ये झटका, क्विंटन डी कॉक आऊट
कोल मॅककोंची याने दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला आहे. कोल मॅककोंची याने क्विंटन डी कॉक याला लॉकी फर्ग्यूसन याच्या हाती कॅच आऊट केलं. क्विंटन डी कॉक याने 10 धावा केल्या. त्यानंतर कोलने दुसऱ्याच बॉलवर रायन रिकेल्टन याला फिन एलन याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : सामन्याला सुरुवात, दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग, सलामी जोडी मैदानात
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि कॅप्टन एडन मार्करम ही सलामी जोडी मैदानात आली आहे. आता न्यूझीलंडचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार? हे 20 ओव्हरनंतर स्पष्ट होईल.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन लन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स निशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडेन मार्कराम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : न्यूझीलंडने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉलिंगचा निर्णय
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेकीचा कौल लागणार आहे. आता कुणाच्या बाजूने हा कौल लागतो हे थोड्याच मिनिटांत स्पष्ट होईल.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : टिम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, जेम्स नीशम, काइल जेमिसन आणि डेव्हॉन कॉनवे.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका टीम
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम(कर्णधार), क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्खिया, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, मार्को जॅन्सन, केशव महाराज आणि जेसन स्मिथ.
-
SA vs NZ, T20 Semi Final Live Updates : दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड आमनेसामने, कोण पोहचणार फायलमध्ये?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकचो आणि अंतिम फेरीचं तितकीट मिळवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
वडगाव कासारी गावात गायीवर बिबट्याचा हल्ला
वडगाव कासारी गावात गायीवर बिबट्याचा हल्ला
भूम तालुक्यातील वारे वडगाव कासारी गावातील शेतकऱ्याच्या गायीवर बिबट्याचा हल्ला
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या गाईवर हल्ला करत असताना लाईव्ह व्हिडिओ
बाळासाहेब भागवत नलावडे या शेतकऱ्याच्या गायीवर बिबट्याचा हल्ला
बिबट्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण
Published On - Mar 04,2026 5:59 PM
