12 जून 2026
Created By: संजय पाटील
आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 वा पर्व ऐतिहासिक असा ठरला आहे.
वुमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत यंदा तब्बल 2 असोसिएट टीम्स सहभागी झाल्या आहेत.
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 2 असोसिएट संघांची खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
नेदरलँड्स आणि स्कॉटलँड या 2 असोसिएट संघांनी क्वालिफायर स्पर्धेतून वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे.
नेदरलँड्सची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्याची पहिलीच वेळ आहे. नेदरलँड्ससमोर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.
स्कॉटलँड सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. स्कॉटलँडसमोर इंग्लंड, न्यूझीलंड, विंडीज, श्रीलंका आणि आयर्लंडचं आव्हान असणार आहे.