AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Eng : ‘वानखेडेवरचा आवाज शांत करू’, सेमी फायनलमध्ये भारताशी भिडण्याआधी इंग्लंडच्या खेळाडूच्या वल्गना, दिला मोठा इशारा

T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आता नॉकआऊट स्टेज म्हणजेच सेमी फायनलचे साने होणार आहेत. उद्या भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार असून वानखेडेवर ही मॅच रंगणार आहे. मात्र या मॅचपूर्वीच इंग्लंडच्या खएळाडून वल्गना केल्या असून मोठा इशाराही दिला आहे.

Ind vs Eng : 'वानखेडेवरचा आवाज शांत करू',  सेमी फायनलमध्ये  भारताशी भिडण्याआधी इंग्लंडच्या खेळाडूच्या वल्गना, दिला मोठा इशारा
सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध भिडणार इंग्लंडImage Credit source: social media
| Updated on: Mar 04, 2026 | 12:12 PM
Share

T20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलला आजपासून सुरूवात होणार असून , आज दक्षिण आफ्रिकेचा सामना न्युझीलंडशी होणार आहे. तर उद्या यजमान भारत हा इंग्लंडशी भिडणार आहे. सेमी फायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याला नमवून फायनलमध्ये धडक मारण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल. उद्या म्हणजेच 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने येतील. मात्र सेमीफायनलमध्ये भारताशी भिडण्यापूर्वीच सामन्यापूर्वी, इंग्लंडच्या खेळाडूने एक मोठं विधान केलंय. स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कॅरनने केलेल्या या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे.

वानखेडे स्टेडियम हे उत्साही आणि गोंगाटपूर्ण वातावरणासाठी ओळखले जाते. उपांत्य फेरीत, भारतीय चाहते टीम इंडियाच्या समर्थनार्थ एकच जल्लोष करतील अशी अपेक्षा आहे. पण सॅम करनचा इरादा वेगळाच आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सॅमने मोठं विधान केलं. “हे एक भव्य आणि प्रतिष्ठित स्टेडियम आहे. मला खात्री आहे की गुरुवारी रात्री येथे खूप शांतता असेल. एक तरुण क्रिकेटपटू म्हणून, तुम्ही भारताविरुद्ध विश्वचषक उपांत्य सामना खेळण्याचे स्वप्न पाहता. येथील विकेट सहसा फलंदाजीसाठी चांगल्या असतात आणि मैदान लहान असते, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाईल अशी अपेक्षा आहे” असं म्हणत त्याने भारताला हरवण्याचं एक प्रकारे आव्हान दिलं आहे.

पॅट कमिन्सची आठवण

2023 मध्ये वर्ल्डकप फायनलपूर्वी, पॅट कमिन्सने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाखाहून अधिक भारतीय चाहत्यांच्या गर्दीला शांत करण्याबद्दल विधान केलं होतं. अंतिम सामन्यापूर्वी, त्याने प्रेक्षकांना शांत बसवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विराट कोहलीची विकेट घेऊन त्याने इच्छा पूर्ण केली. कारकिर्दीतील सर्वात आनंदाचा क्षण म्हणून त्या शांततेचे वर्णन त्याने केलं होतं.

भारतविरुद्ध दबावाला घाबरणार नाही इंग्लंड

उद्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला एका मजबूत भारतीय संघाचा सामना करावा लागणार आहे. पण सॅम कॅरन दबावाखआली दिसला नाही. आमच्या संघाला भारतीय परिस्थितीत खेळण्याची सवय आहे. संघातील बहुतेक खेळाडूंनी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि आयपीएलमध्येही भाग घेतला आहे असं तो म्हणाला. इंग्लंडला या मोठ्या टप्प्याची भीती वाटत नाही. “आम्हाला एक परिपूर्ण खेळ खेळायचा आहे,” असं तो म्हणाला.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?