AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका, तब्बल 16 मेट्रो स्टेशन राहणार बंद, घटनास्थळी परिस्थिती काय?

नवी दिल्लीतील आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत.

नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका, तब्बल 16 मेट्रो स्टेशन राहणार बंद, घटनास्थळी परिस्थिती काय?
| Updated on: Jul 23, 2026 | 8:59 AM
Share

नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका उडाला आहे. जंतरमंतरवर मध्यरात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या हिंसक घटनेत आंदोलकांसहित पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. त्यानंतर आज गुरुवारी देशासहित विविध भागात आंदोलन पेटलं आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या पार्श्वभूमीवर शहरातील 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो स्टेशनच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मिळतेय. काँग्रेस आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत.

कोणते मेट्रो स्टेशन बंद राहणार?

नवी दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. यात लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखम्बा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालाय, ITO, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ ,खान मार्केट, जोर बाग, शिवाजी स्टेडियम या मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे टाळणे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या मेट्रो स्टेशनवर एन्ट्री आणि एक्झिट बंद असणार आहे.

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने ‘एक्स’वर पोस्ट करत मेट्रो स्टेशन बंद करण्याची माहिती दिली आहे. सर्व मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची आदेश देण्यात आले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसद भवनापर्यंत पोहोचणाऱ्या मार्गावरील मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनामुळे पावसाळी अधिवेशनातील राजकीय नेतांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे कायदा व्यवस्था बिघडली आहे. सुरक्षेच्या कारणात्सव मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, कॉक्रोच जनता पक्षाने 20 मार्च रोजी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या. तर काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहित इतर आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.

Follow Us
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...