AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष

Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष

| Updated on: Oct 28, 2026 | 12:21 PM
Share

पुणे पदवीधर मतदारसंघ 2026 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हर्षदा जाधव आघाडीवर आहेत. त्यांना 1,11,279 मते मिळाली असून विजयासाठी 1,816 मतांची गरज आहे. भाजपच्या स्मिता जाधव यांना 1,02,427 मते मिळाली आहेत. कोट्यासाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या 2026 च्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा जाधव आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या पसंतीची मते मोजल्यानंतर हर्षदा जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

आतापर्यंत हर्षदा जाधव यांना 1,11,279 मते मिळाली असून, विजयासाठी आवश्यक असलेला 1,13,095 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी 1,816 मतांची गरज आहे. भाजपच्या स्मिता जाधव यांना 1,02,427 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सध्या दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याचे काम सुरू आहे. हर्षदा जाधव सध्या स्मिता जाधव यांच्यापेक्षा जवळपास 8,852 मतांनी पुढे आहेत. दुपारी 3:00 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यानंतर या जागेचा अंतिम निकाल अपेक्षित आहे.

Published on: Oct 28, 2026 12:21 PM

Follow Us