AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर

Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर

| Updated on: Oct 28, 2026 | 10:34 AM
Share

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी गेल्या पंचवीस तासांपासून सुरू आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे जयंत आसगावकर पराभूत झाले आहेत. मराठवाडा पदवीधरमधून राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर असून, तीन टर्म आमदार राहिलेले सतीश चव्हाण पिछाडीवर आहेत. महायुती तीन, तर महाविकास आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. गेल्या पंचवीस तासांपासून ही मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती तीन जागांवर, तर महाविकास आघाडी दोन जागांवर आघाडीवर आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, याच मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांचा पराभव झाला असून, ते दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत बाद झाले आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर आहेत.

सर्वांचे लक्ष लागलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) चे प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सतीश चव्हाण सध्या पिछाडीवर आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात कोहळे आणि वंजारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. 88,558 मतांचा कोटा निश्चित झाला असून, अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Published on: Oct 28, 2026 10:34 AM

Follow Us